PMC Election Nomination | आज दिवसभरात ६९४  नामनिर्देशन पत्रे दाखल

Homeadministrative

PMC Election Nomination | आज दिवसभरात ६९४  नामनिर्देशन पत्रे दाखल

Ganesh Kumar Mule Dec 29, 2025 9:34 PM

Pune Festival | IAS Vikra Kumar | सौ.व श्री विक्रम कुमार यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना संपन्न
PM Awas Yojana | PMC Pune | पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून वडगाव, हडपसर आणि खराडी येथे उभारल्या 2650 सदनिका  | पंतप्रधान यांच्या हस्ते देण्यात येणार घराच्या चाव्या 
 PMC Officers Promotion | General Body Meeting | मुख्य अभियंता पदावर बढती देण्यात मुख्य सभेची मंजूरी

PMC Election Nomination | आज दिवसभरात ६९४  नामनिर्देशन पत्रे दाखल

 

PMC Election 2025 -26 – (The Karbhari News Service) – राज्य निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ कार्यक्रम जाहीर झाला आहे. याकरिता ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे २३  ते २७ डिसेंबर पर्यंत एकूण ४९ इतके नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते.  तर आज रोजी एकूण ६९४ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Corporation Election 2025-26)

 

१५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडून  २३ ते २७ पर्यंत एकूण १०३०७ इतके तर आज  रोजी एकूण १४४९ नामनिर्देशन फॉर्मची विक्री करण्यात आली आहे.

नामनिर्देशन फॉर्मची आज  सर्वात जास्त विक्री निवडणूक निर्णय अधिकारी, भवानी पेठ कार्यालय, पुणे महानगरपालिका यांचे कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे. तथापि सर्वात कमी विक्री निवडणूक निर्णय अधिकारी, येरवडा कळस धानोरी कार्यालय, पुणे महानगरपालिका यांचे कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे. तर आज रोजी एकूण ६९४ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत.

येरवडा कळस धानोरी कार्यालय –६९;

नगर रोड -वडगाव शेरी कार्यालय – ८८;

कोथरूड बावधन कार्यालय –२४;

औंध बाणेर कार्यालय –२०;

शिवाजीनगर घोले रोड कार्यालय –१४;

कै बा स ढोले पाटील रोड कार्यालय –४७;

हडपसर मुंढवा कार्यालय –६३;

वानवडी रामटेकडी कार्यालय –४२;

बिबवेवाडी कार्यालय –७२;

भवानी पेठ कार्यालय –५९,

कसबा विश्रामबाग वाडा कार्यालय –३२;

वारजे कर्वेनगर कार्यालय –४८

सिंहगड रोड कार्यालय –४०

धनकवडी सहकारनगर कार्यालय –५८

कोंढवा येवलेवाडी कार्यालय –१८

असे एकूण ६९४ (सहाशे चौऱ्यान्नव) नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आलेली आहेत.

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करणेसाठी पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये विविध आचारसंहिता पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. जेणेकरून निवडणूक प्रक्रिया मुक्त, पारदर्शी आणि निर्भयपणे पार पाडण्यास मदत होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: