PMC Election Final Ward Structure | पुणे महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर | ८ प्रभागांची नावे बदलली | १३२९ हरकती मान्य केल्या
PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – पुणे महापलिका निवडणुकी साठीची अंतिम प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. ५९२२ हरकती पैकी १३२९ हरकती मान्य केल्या आहेत. तर ८ प्रभागांची नावे बदलण्यात आली आहेत. दरम्यान अपेक्षित बदल केल्याने बरेच इच्छुक आता खुश झाले आहेत. तर आरक्षण सोडत १५ ऑक्टोबर पर्यंत केली जाईल. अशी माहिती महापालिका उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या वतीने देण्यात आली. दरम्यान अंतिम प्रभाग रचना आज संध्याकाळ पर्यंत गॅझेट मध्ये पब्लिश होईल. (Pune Municipal Corporation Election 2025)
पुणे महापालिका निवडणुकी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर नागरिकांना हरकती आणि सूचना देण्यासाठी ४ सप्टेंबर दुपारी ३ पर्यंत कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद देणे सुरू केले होते. शेवटच्या दिवशी हरकती आणि सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला. प्रभागाची नावे बदलणे, नैसर्गिक हद्दी बाबत नागरिकांनी हरकती घेतल्या होत्या. एकूण ५९२२ हरकती आणि सूचना आल्या होत्या.
हरकती सूचनांवर सुनावणीसाठी शासनाचा प्राधिकृत अधिकारी नेमण्यात आला होता. प्रारूप प्रभाग रचनेबाबत प्राप्त हरकती / सूचना वरील जाहीर सुनावणी व्ही.राधा, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई (महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग प्राधिकृत अधिकारी) यांच्या समोर ११ आणि १२ सप्टेंबर या दिवशी झाली. त्यानंतर शासनाचे प्राधिकृत अधिकारी यांनी महापालिका आयुक्त यांच्या मार्फत अंतिम प्रभाग रचना नगर विकास विभागाकडे सादर केली. आपल्या शिफारशी सहित हा अहवाल पाठवण्यात आला होता. त्यानुसार तिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार ही मान्यता मिळालेली आहे.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण ५९२२ हरकती आणि सूचना आल्या होत्या. त्यातील १३२९ हरकती आणि सूचना मान्य करण्यात आल्या आहेत. ६९ अंशत: मान्य तर ४५२४ इतक्या हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत.
-
या प्रभागात करण्यात आले आहेत बदल
प्रभाग क्रमांक १, ४, १४, १५, १७, १८, २०, २४, २६, २७, ३४, ३८, ३९
– या ८ प्रभागांची नावे बदलली
प्रभागाचे जुने नांव – १. कळस – धानोरी – प्रभागाचे नवीन नांव – कळस – धानोरी-लोहगाव उर्वरित
प्रभागाचे जुने नांव – १४. कोरेगाव पार्क – मुंढवा – प्रभागाचे नवीन नांव – कोरेगाव पार्क – घोरपडी – मुंढवा
प्रभागाचे जुने नांव – १५ . मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी – प्रभागाचे नवीन नांव – मांजरी बुद्रुक – केशवनगर – साडेसतरा नळी
प्रभागाचे जुने नांव – १७ – रामटेकडी माळवाडी – प्रभागाचे नवीन नांव – रामटेकडी – माळवाडी- वैदुवाडी
प्रभागाचे जुने नांव – २० – बिबवेवाडी- महेश सोसायटी – प्रभागाचे नवीन नांव – शंकर महाराज मठ – बिबवेवाडी
प्रभागाचे जुने नांव – २४ – कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ – प्रभागाचे नवीन नांव – कसबा गणपती- कमला नेहरू हॉस्पिटल के. ई. एम. हॉस्पिटल
प्रभागाचे जुने नांव – २६ – गुरुवार पेठ – घोरपडे पेठ – प्रभागाचे नवीन नांव – घोरपडे पेठ – गुरुवार पेठ – समताभूमी
प्रभागाचे जुने नांव – ३८ – आंबेगाव – कात्रज – प्रभागाचे नवीन नांव – बालाजीनगर- आंबेगाव – कात्रज
—–
१५ ऑक्टोबर पर्यंत आरक्षण सोडत
दरम्यान महापालिका निवडणूक साठीची आरक्षण सोडत १५ ऑक्टोबर पर्यंत घोषित होईल. असे महापलिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. गणेश कला क्रीडा रंगमंच इथे ही सोडत होईल. दरम्यान ४१ प्रभागापैकी २ प्रभाग हे एसटी साठी आरक्षित आहेत. तर २२ प्रभाग एससी साठी आरक्षित आहेत.
दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल – चंद्रकांत पाटील
लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाची ही निवडणूक आहे. कदाचित आज (4 ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल. आता कुणीतरी म्हणतील निवडणूक आयोगाशी दादांची चर्चा झाली वाटतं. मी 40 वर्षे यामध्ये घालवली त्यामुळे मी अंदाज मांडला आहे. दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil PMC election statement) म्हटले आहे. आज भाजपचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीसाठी कानमंत्र दिला.
निवडणूक ही फास्ट ट्रेन प्रमाणे आहे, प्लॅटफार्मवर जो राहील तो राहील. मात्र, नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नाबरोबर नशीब देखील लागतं. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक असला पाहिजे. 2017 ची परिस्थिती बदला, त्यासाठी येणाऱ्या दिवाळीचा फायदा करून घ्या. लोकांना भेटून संपर्क वाढवा. निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे मात्र शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील, असे ते म्हणाले. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू, पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाईल असं लढणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS