PMC Ghanbhatta Waras | घाणभत्ता मिळणाऱ्या सेवकाच्या वारस प्रकरणाची प्रशासकीय कार्यवाही सेवक सेवानिवृत्त होण्याच्या १ वर्ष आधीच सुरू करावी

Homeadministrative

PMC Ghanbhatta Waras | घाणभत्ता मिळणाऱ्या सेवकाच्या वारस प्रकरणाची प्रशासकीय कार्यवाही सेवक सेवानिवृत्त होण्याच्या १ वर्ष आधीच सुरू करावी

Ganesh Kumar Mule Jul 15, 2026 11:12 AM

PMC General Body | विधी समितीने मान्य केलेले दोन प्रस्ताव मुख्य सभेने फेटाळले! 
PMC Employees Union | विधी समितीने मान्य केलेल्या प्रस्तावाला लेखनिकी संवर्गातील २५०० कर्मचाऱ्यांचा विरोध! 
PMC Municipal Secretary | योगिता भोसले यांना नगरसचिव पदावर पदोन्नती | विधी समिती आणि मुख्य सभेची एकाच दिवशी मान्यता!

PMC Ghanbhatta Waras | घाणभत्ता मिळणाऱ्या सेवकाच्या वारस प्रकरणाची प्रशासकीय कार्यवाही सेवक सेवानिवृत्त होण्याच्या १ वर्ष आधीच सुरू करावी

|विरोधी पक्षनेते अँड. निलेश निकम आणि दत्ता धनकवडे यांची मागणी; विधी समितीपुढे प्रस्ताव

 

PMC Law Committee – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वेतनात “घाणभत्ता” मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची प्रक्रिया सेवानिवृत्तीच्या १ वर्ष आधीच सुरू करावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव विरोधी पक्षनेते अँड. निलेश निकम, आणि माजी नगरसेवक दत्ता धनकवडे यांनी विधी समितीसमोर ठेवला आहे. (Pune PMC News)

प्रस्तावात म्हटले आहे की, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार पुणे महानगरपालिकेतील ज्या सेवकांना वेतनात घाणभत्ता मिळतो, अशा सेवकांच्या एका पात्र वारसाला वारसाहक्काने नोकरी दिली जाते.

मात्र सध्या ही वारस प्रकरणाची कार्यवाही संबंधित सेवक सेवानिवृत्त झाल्यानंतरच सुरू होते. त्यामुळे वारस प्रमाणपत्र, कागदपत्रांची पूर्तता आणि प्रशासकीय मंजुरी यासाठी पात्र वारसाला महानगरपालिकेच्या सेवेत रुजू होण्यासाठी जवळपास १ वर्षाचा कालावधी लागतो.

परिणामी जेवढी वारस प्रकरणे प्रलंबित असतात तेवढी पदे रिक्त राहतात आणि वारसांनाही नोकरीसाठी विलंबाला सामोरे जावे लागते, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रस्तावकांनी विधी समितीकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत:
1. वेतनामध्ये घाणभत्ता मिळालेल्या सेवकाच्या वारस प्रकरणाची प्रशासकीय कार्यवाही सेवक सेवानिवृत्त होण्याच्या १ वर्ष आधीच सुरू करण्यात यावी.
2. संबंधित सेवक सेवानिवृत्त झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच वारसाची नेमणूक करण्यात यावी.

यामुळे रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लागेल आणि वारस कुटुंबियांना आर्थिक आधार वेळेत मिळेल, असा उद्देश या प्रस्तावामागे आहे.

हा प्रस्ताव सध्या विधी समितीच्या विचारार्थ पाठविण्यात आला आहे. समितीने याला मंजुरी दिल्यानंतर तो सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णयासाठी सादर केला जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: