Pune River Improvement Project | नदी सुधार प्रकल्प तातडीने राबविण्याचे आयुक्तांचे निर्देश

Homeadministrative

Pune River Improvement Project | नदी सुधार प्रकल्प तातडीने राबविण्याचे आयुक्तांचे निर्देश

Ganesh Kumar Mule Aug 04, 2026 5:16 PM

City Transformation Cell | शहर स्तरावर शहर परिवर्तन कक्ष स्थापन करण्याचा निर्णय | सर्व विभागाचे नोडल अधिकारी असतील | कक्षाची बैठक प्रत्येक महिन्यातून एकदा
Pune Road Potholes | दिवाळीच्या दिवसात पुणेकरांना खड्ड्यात घालू नका | रस्ते खोदाईची कामे थांबवण्याची मागणी
Naval Kishore Ram IAS | दर तीन महिन्याला महापालिका सेवकांच्या प्रश्नाबाबत बैठक घेणार | महापालिका आयुक्त यांचे  आश्वासन 

Pune River Improvement Project | नदी सुधार प्रकल्प तातडीने राबविण्याचे आयुक्तांचे निर्देश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मुळा-मुठा नदीलगत दरवर्षी पूरस्थिती निर्माण होणाऱ्या भागांची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागांची पाहणी केली. (Aundh Baner Ward Office)

हॅरिस ब्रिज परिसर, आदर्श नगर, स्मशानभूमी परिसर, बोपोडी सबवे आणि चंद्रमणी नगर या भूयांमध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असल्याने सुमारे ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागते. या पार्श्वभूमीवर पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नदी सुधार प्रकल्पासह विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

पाहणीनंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नदी सुधार प्रकल्पाची कामे तातडीने सुरू करण्याचे तसेच पूरनियंत्रणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश दिले. या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी आयुक्तांच्या दालनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

या पाहणीवेळी  उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, नगरसेवक सनी निम्हन, नगरसेविका भक्ती गायकवाड, नगरसेविका सपना छाजेड, आनंद छाजेड, अविनाश कदम, महापालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त विजय नायकल. मुख्य अभियंता राजेश बनकर (पथ विभाग), मुख्य अभियंता मनीषा शेकटकर (विद्युत विभाग) तसेच उपअभियंता खेहा वाघचौरे (भवन विभाग) उपस्थित होते.

पूरग्रस्त नागरिकांना वारंवार होणारा त्रास कमी करण्यासाठी दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना राबविण्यावर महापालिका प्रशासनाचा भर असल वेळी स्पष्ट करण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: