PMC Dy Health Officer | पुणे मनपात उप आरोग्य अधिकारी पदाच्या 3 जागांसाठी पदोन्नतीचा प्रस्ताव!

Homeadministrative

PMC Dy Health Officer | पुणे मनपात उप आरोग्य अधिकारी पदाच्या 3 जागांसाठी पदोन्नतीचा प्रस्ताव!

Ganesh Kumar Mule Aug 19, 2026 7:53 PM

Mahatma Jyotiba Phule Janaarogya Yojana | महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना  | रुग्णांसाठी महापालिका दीड कोटींची साधनसामुग्री खरेदी करणार 
Urban 95 | PMC Kids Festival 2.0 | पुणे महानगरपालिकेच्या अर्बन९५ बालोत्सव २.० ला 1 लाखांहून अधिक पालक, शिक्षकांचा प्रतिसाद
MP Supriya sule | नगर मध्ये बारा तास अडकलेली निजामुद्दीन एक्स्प्रेस खा. सुळेंच्या प्रयत्नामुळे सकाळी पुण्यात| प्रवाशांनी मानले सुप्रियाताईंचे आभार

PMC Dy Health Officer | पुणे मनपात उप आरोग्य अधिकारी पदाच्या 3 जागांसाठी पदोन्नतीचा प्रस्ताव!

महिला बाल कल्याण समितीसमोर शिफारस : पात्र सहायक आरोग्य अधिकाऱ्यांची नावे सादर

 

PMC Officer Promotion – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील उप आरोग्य अधिकारी, वर्ग 1 या पदाच्या रिक्त जागा तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीसमोर (PMC Women and Child Welfare Committee) ठेवण्यात आला आहे. दरम्यान आजची समितीची बैठक तहकूब झाल्याने यावर निर्णय होऊ शकला नाही. यावर आता आगामी बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

3 पैकी 3 पदे रिक्त
शासन निर्णयानुसार पुणे मनपात उप आरोग्य अधिकारी या संवर्गाची 3 पदे मंजूर आहेत. सध्या ही तिन्ही पदे रिक्त आहेत. या पदांची वेतनश्रेणी एस-25, 78800 ते 209200 रुपये आहे. पदोन्नतीसाठी 100 टक्के आरक्षणाची तरतूद असून, त्यापैकी 2 जागा खुल्या प्रवर्गासाठी आणि 1 जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे.

खातेनिहाय बढती समितीची बैठक
7 ऑगस्ट  रोजी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली खातेनिहाय बढती समितीची बैठक झाली. या बैठकीत सहायक आरोग्य अधिकारी, वर्ग 1 या संवर्गातून पात्र असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावांची छाननी करण्यात आली.

बैठकीत अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखापरीक्षक, उप आयुक्त – मागासवर्ग विभाग, आरोग्य अधिकारी, उप आयुक्त सामान्य प्रशासन आणि विधी अधिकारी उपस्थित होते.

कोण आहेत पदोन्नतीसाठी पात्र?
सेवा ज्येष्ठतेनुसार आणि 5 वर्षांच्या गोपनीय अहवालाची पडताळणी करून खालील 3 अधिकाऱ्यांची नावे पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात आली आहेत.

1. डॉ. वैशाली उत्तम जाधव – सेवा ज्येष्ठता क्रमांक 1, नेमणूक दिनांक – 19/03/2008, प्रवर्ग इमाव
2. डॉ. नाईक मनिषा विनोद – सेवा ज्येष्ठता क्रमांक 2, नेमणूक दिनांक 27/07/2018, प्रवर्ग खुला
3. डॉ. देवकर सूर्यकांत एकनाथ – सेवा ज्येष्ठता क्रमांक 4, नेमणूक दिनांक 27/08/2022, प्रवर्ग खुला

प्रतिक्षा यादीत डॉ. दिघे राजेश मधुकर यांचे नाव आहे.

शासन निर्णय आणि पात्रता काय सांगते?
30/01/2025 च्या शासन निर्णयानुसार या पदासाठी MBBS पदवी आणि DPH पदविका किंवा PSM/MD/MS किंवा CPS डिप्लोमा आवश्यक आहे. याशिवाय राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत सहायक आरोग्य अधिकारी म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

CPS च्या डिप्लोमा बाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, 14 जुलै 2023 पूर्वी प्रदान केलेले डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ हे पदोन्नतीसाठी पात्र मानण्याचे निर्देश आहेत. त्यानुसारच ही प्रक्रिया राबवली जात आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 53(1) नुसार या नियुक्त्यांसाठी मुख्य सभेची मान्यता आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मुख्य सभेकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे.

पुणे मनपाची हद वाढल्याने आणि कामाचा व्याप वाढल्याने आरोग्य विभागात उप आरोग्य अधिकारी पद भरणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: