Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणार | महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिला विश्वास 

Homeadministrative

Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणार | महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिला विश्वास 

Ganesh Kumar Mule May 14, 2026 9:58 PM

Online NOC for PMC Election 2025-26 | NOC साठी एकूण ४०५७ अर्ज | २४७ अर्ज बाद | ३७८३ अर्जदारांना ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र!
Central Government on PMC | पुणे महापालिकेला केंद्राकडून लवकरच ७१० कोटी रुपयांचा निधी मिळणार
MLC Election | महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर,शिक्षक मतदार संघ द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणार | महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिला विश्वास

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या डेक्कन येथील स्मारकाचे नूतनीकरण भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे यांनी विश्वास दिला की, “येत्या एक वर्षात ह्या स्मारकाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्याचा पुणे महानगरपालिके चा प्रयत्न असेल.” (Pune News)

पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील भव्य अश्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे नूतनीकरण भूमिपूजन समारंभ  धर्मवीर संभाजी महाराजांच्या ३६९ व्या जयंती निमित पार पाडला. या स्मारकाचे नूतनीकरण होणार असून त्याचे भूमिपूजन  खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने सकाळी शंभु महाराजांचा जन्मोत्सव सोहळा (पाळणा) साजरा करण्यात आला. तसेच पुण्यातील इतिहास संशोधकांचा व नित्यपूजा करणाऱ्या संस्थांचा  यावेळी प्रतिष्ठान मार्फत सन्मान करण्यात आला.

प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर म्हणाले, “ह्या स्मारका मार्फत संभाजी महाराजांचे कार्य, चरित्र आणि विचार आपल्याला आणखी दूर पोहोचवायचे आहेत .”

यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले,  नगरसेवक राघवेंद्र मानकर तथा अध्यक्ष धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान पुणे, तसेच  नगरसेवक अपूर्व खाडे, अमृता म्हेत्रे, सुनिल पांडे, निवेदिता एकबोटे, अल्पना वरपे, पृथ्वीराज सुतार, विशाल धनावडे, धीरज घाटे, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, नारायण गलांडे, तेजश्री पवळे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पदाधिकारी, पुणे महानगरपालिके चे उपायुक्त व स्थानिक नागरिक व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0