PMC Contract Employees | पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा बंधनकारक | स्थायी समितीत ठराव मंजूर

Homeadministrative

PMC Contract Employees | पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा बंधनकारक | स्थायी समितीत ठराव मंजूर

Ganesh Kumar Mule Jun 23, 2026 8:38 AM

Omprakash Divate PMC | जनगणना 2027 च्या घरयादी कामाला वेग नाही; मनपा अतिरिक्त आयुक्तांनी दिला कडक इशारा
PMC Pune Employees | मृत आणि सेवानिवृत्त सेवकांना देखील प्रशासनाकडून दिल्या जातात ऑर्डर  | सेवकांची यादी अद्ययावत केली जात नसल्याची माहिती 
Mukta Tilak | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

PMC Contract Employees | पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा बंधनकारक | स्थायी समितीत ठराव मंजूर

 

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने कंत्राटी सेवकांना वैद्यकीय विमा देणे कंत्राटदारांसाठी बंधनकारक करण्याचा ठराव मंजूर केला आहे. समिती सदस्य आणि भाजप नगरसेवक संदीप बेलदरे यांनी याबाबत प्रस्ताव दिला होता. (Sandip Beldare PMC)

ठरावानुसार, आता महापालिकेला मनुष्यबळ पुरवणाऱ्या सर्व विद्यमान आणि नवीन ठेकेदारांना त्यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्याचा वैद्यकीय विमा उतरवणे अनिवार्य राहील.

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये मोठ्या संख्येने कंत्राटी सेवक काम करत असून ते अत्यावश्यक आणि दैनंदिन सेवांमध्ये मोलाचे योगदान देतात. मात्र कंत्राटी स्वरूपात काम करत असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय संरक्षणाचा लाभ मिळत नाही. अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आपत्तीमुळे या कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण पडतो.

हा प्रश्न सोडवण्यासाठी स्थायी समितीने ठरवले आहे की, जर या सेवकांना वैद्यकीय विमा किंवा संरक्षण दिले, तर त्यांना वेळेवर उपचार मिळून त्यांची सामाजिक व आर्थिक सुरक्षा सुनिश्चित होईल.

यापुढे भविष्यात काढल्या जाणाऱ्या सर्व मनुष्यबळ पुरवठ्याच्या निविदांमध्ये ही अट प्रामुख्याने समाविष्ट करण्यात यावी. जी एजन्सी किंवा ठेकेदार मेडिक्लेम देण्यास तयार असेल, त्यांनाच पात्र ठरवण्यात यावे, असेही ठरावात नमूद केले आहे.

ठेकेदाराने दरमहा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विम्याचा हप्ता भरल्याची पावती आणि पॉलिसीची प्रत संबंधित विभागाकडे सादर करणे बंधनकारक राहील. त्यानंतरच ठेकेदाराचे मासिक बिल अदा करण्यात येईल.

या निर्णयामुळे महापालिकेतील कंत्राटी सेवकांना आरोग्य संरक्षण मिळून त्यांच्या कुटुंबांनाही दिलासा मिळणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: