PMC Contract Employees | पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी!

HomeBreaking Newsपुणे

PMC Contract Employees | पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी!

गणेश मुळे Jul 06, 2024 6:11 AM

PMC Retired Employees | सह महापालिका आयुक्त गालिंदे, मुख्य अभियंता कंदूल यांच्यासहित महापालिकेचे 70 कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त
PMC Pune Retired Employees | आपले शरीर स्वस्थ तर सर्व दुनिया स्वस्त – डॉ दत्ता कोहिनकर यांनी दिला मंत्र | पुणे महापालिकेचे 156 कर्मचारी सेवानिवृत्त!
International Women’s Day | पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियन आणि पुणे मनपा कडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन! | लकी ड्रॉ मध्ये पाच महिलांना मिळाली भेट 

PMC Contract Employees | पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी!

| कंत्राटी कामगारांना पुणे मनपाचा अपघात विमा

PMC Contract Employees Accident Insurance Scheme – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिकेत काम करणाऱ्या जवळपास 8 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचा सुमारे 15 लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवला जाणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अवघे 265 रुपये 50 पैसे घेतले जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे (Nitin Kenjale PMC) यांनी दिली. (Pune PMC News)
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने कायम कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना (PMC Group Accident Insurance Scheme) चालवली जाते. पूर्वी कर्मचाऱ्याकडून 136 रुपये घेऊन 10 लाखाचा विमा उतरवला जायचा. मात्र मागील वर्षीपासून रक्कम वाढवली आहे. वर्ग-1 साठी 25 लाख, वर्ग- 2 साठी 20 लाख, वर्ग- 3 व 4 साठी 15 लाख इतका विमा उतरवला जात आहे. मात्र ही योजना कंत्राटी कामगारांसाठी नव्हती. याबाबत मुख्य कामगार अधिकारी नितिन केंजळे यांनी पुढाकार घेऊन कंत्राटी कामगारांसाठी देखील ही योजना आता चालवली जाणार आहे.
 
याबाबत नितीन केंजळे यांनी सांगितले कि, कंत्राटी कामगारांचा विमा उतरवण्यासाठी New India Assurance कंपनीने तयारी दाखवली. त्यानुसार महापालिकेतील ठेकेदार देखील यासाठी तयार झाले आहेत. त्यानुसार विमा उतरवण्यास सुरुवात झाली आहे. ठेकेदारांच्या मार्फत विमा उतरवण्यात येत आहेत. 
 
पुणे महापालिकेत जवळपास 8 हजाराहून अधिक कंत्राटी कमर्चारी आहेत. हे सगळे वर्ग 4 मधील कर्मचारी आहेत. या लोकांना जोखमीची कामे करावी लागतात. यात काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील होतो. परिणामी या लोकांचे कुटुंब उघड्यावर पडते. असे होऊ नये यासाठी 15 लाखाचा विमा उतरवण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे केंजळे यांनी सांगितले. 
 
केंजळे यांनी पुढे सांगितले कि, अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंग झाल्यास त्या त्या प्रमाणात ही रक्कम मिळेल. त्यासाठी कर्मचाऱ्यांना फक्त 265 रुपये 50 पैसे द्यावे लागणार आहेत. हे काम ठेकेदारा मार्फतच केले जाणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा उतरवण्याबाबत ठेकेदारांना सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार ठेकेदारांनी सुरुवात केली आहे. कामगारांना याचा चांगला लाभ होऊ शकतो. ठेकेदारानी आणि कर्मचाऱ्यांनी याची गंभीरतेने दखल घेऊन याचा लाभ घ्यावा.
नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी, पुणे मनपा.