PMC CIC Committee | स्वारगेट–कात्रज मेट्रोचा विस्तार शिवापूर टोलनाका ते प्रस्तावित रिंगरोडपर्यंत : शहर सुधारणा समितीत प्रस्ताव मान्य

Homeadministrative

PMC CIC Committee | स्वारगेट–कात्रज मेट्रोचा विस्तार शिवापूर टोलनाका ते प्रस्तावित रिंगरोडपर्यंत : शहर सुधारणा समितीत प्रस्ताव मान्य

Ganesh Kumar Mule Mar 20, 2026 7:00 PM

Pune Airport New Terminal | पुणे विमानतळ येथील नूतन टर्मिनल २ पंधरा तारखेपर्यंत सुरू न केल्यास 16 जानेवारीला उद्घाटन करू  | मोहन जोशी
PMC Contract Employees Bonus | Sunil Shinde | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत राष्ट्रीय मजदूर संघ (RMS) करणार आमरण उपोषण
PMC Property tax Department | मिळकत कर विभागाकडून ५८ मिळकती सील | जप्ती कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार

PMC CIC Committee | स्वारगेट–कात्रज मेट्रोचा विस्तार शिवापूर टोलनाका ते प्रस्तावित रिंगरोडपर्यंत : शहर सुधारणा समितीत प्रस्ताव मान्य

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणारा स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्ग पुढे शिवापूर टोलनाका परिसरातून प्रस्तावित रिंगरोडपर्यंत वाढविण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावास पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीने आज झालेल्या बैठकीत मंजुरी दिली असून अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव मुख्य सभेकडे शिफारस करण्यात आला आहे. याबाबत भाजप नगरसेविका वर्षा तापकीर आणि तेजश्री बदक यांनी प्रस्ताव दिला होता. (PMC City Improvement Committee)

याबाबत बोलताना शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते (Smita Vaste PMC) यांनी सांगितले की, “दक्षिण पुणे, कात्रज परिसर तसेच शिवापूर टोलनाका आणि प्रस्तावित रिंगरोडलगत झपाट्याने वाढणारी वसाहत व वाढता वाहतूक ताण लक्षात घेता मेट्रो विस्तार अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, “प्रस्तावित रिंगरोडशी मेट्रोचे प्रभावी कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्यास शहरातील वाहतूक वितरण अधिक संतुलित होईल आणि भविष्यातील शहरी नियोजनाला मोठी चालना मिळेल.”

या विस्तारामुळे कात्रजच्या पुढील भाग, शिवापूर टोलनाका परिसर तसेच रिंगरोडलगतच्या विकसित होत असलेल्या भागांना मोठा फायदा होणार असून खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून शहर सुधारणा समितीने सदर प्रस्तावास मंजुरी देऊन अंतिम मान्यतेसाठी तो मुख्य सभेकडे शिफारस केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: