PMC Chief Finance and Account Officer | जितेंद्र कोळंबे यांची पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी नियुक्ती
| राज्य सरकारकडून आदेश जारी
PMC Chief Account and Finance Officer | पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी (PMC Chief Finance and Account Officer) राज्य सरकारकडून जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेले हे पद भरण्यात आले आहे. (PMC Chief Finance and Account Office)
कोळंबे हे महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीने आले आहेत. याआधी कोळंबे महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे इथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. वित्त व लेखा संचालक संवर्गात त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना सुधारित पदस्थापना देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेत मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांची दोन पदे आहेत. यामध्ये महापालिका अर्थसंकल्पातील जमा बाजू साठी एक अधिकारी आणि खर्चाच्या बाजू साठी दुसरा अधिकारी काम करणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत या दोन्ही पदाचे कामकाज मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर पाहत आहेत. काही वर्षांपूर्वी यातील जमा बाजूची जबाबदारी महापालिकेत प्रतिनियुक्तीने आलेले तत्कालीन उपायुक्त तुषार दौंडकर यांच्याकडे दिली होती. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. अतिरिक्त पदभार कळसकर पाहत आहेत. दरम्यान आता सरकारने दुसरा अधिकारी या पदासाठी दिला आहे. यातील खर्चाची बाजू राज्य सरकारचा अधिकारी पाहणार, कि महापालिकेचा याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. (PMC Pune)
——