PMC Assistant Commissioner | सहाय्यक आयुक्तांचे अधिकार वाढवले | मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयात समन्वय राखण्यासाठी महापालिका आयुक्तांचा निर्णय!

HomeBreaking Newsपुणे

PMC Assistant Commissioner | सहाय्यक आयुक्तांचे अधिकार वाढवले | मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयात समन्वय राखण्यासाठी महापालिका आयुक्तांचा निर्णय!

गणेश मुळे Jun 22, 2024 3:01 PM

Shivsena UBT Pune |  शहर विद्रूपीकरण करूनही भाजप वर कारवाई का नाही ? शिवसेना (UBT) गटाचा महापालिका आयुक्तांना सवाल 
DCM Ajit Pawar on Pune Rain | पावसामुळे दहावी-बारावीची परीक्षा न देऊ शकलेल्यांची स्वतंत्र परीक्षा घेणार | अजित पवार
PMC RTI Nodal Officer | सामान्य प्रशासन विभागाला नकोय माहिती अधिकाराचे काम!

PMC Assistant Commissioner | सहाय्यक आयुक्तांचे अधिकार वाढवले | मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयात समन्वय राखण्यासाठी महापालिका आयुक्तांचा निर्णय!

Dr Rajendra Bhosale IAS – (The Karbhari’s News Service) – पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation-PMC) अंतर्गत असलेल्या विविध कार्यालयामध्ये असमन्वय असल्याचे चित्र तयार होत आहे. तसेच समस्यांचे निराकरण न झाल्याने नागरिक व लोकप्रतिनिधी यांचा महानगरपालिका प्रशासनाबद्दल रोष वाढताना दिसत आहे. ही बाब महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी गंभीरपणे घेतली आहे.  मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयात समन्वय राखण्यासाठी सहाय्यक आयुक्तांना ज्यादा अधिकार देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. (Pune PMC News)

 

पुणे महानगरपालिकेचे भौगोलिक कार्यक्षेत्र हे ५ परिमंडळ उप आयुक्त कार्यालय व १५ महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये विभागले गेलेले आहे. महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी राबविण्यात येणारी विविध विकास कामे महानगरपालिकेच्या मुख्य खाते जमे पथ विभाग, मलनिस्सारण विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग इत्यादी तसेच क्षेत्रिय कार्यालयाकडून विभागांमार्फत राबविली जातात. सदर कामांची अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक अधिकारांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली असून त्यानुसार सर्वसाधारणपणे रक्कम रु. १० लक्ष पर्यंतची कामे क्षेत्रिय कार्यालय, रक्कम रु.२५ लक्ष पर्यंतची कामे उप आयुक्त, परिमंडळ कार्यालय व त्यापेक्षा जास्त किंमतीची कामे मुख्य खात्याकडून राबविली जातात.
यामुळे क्षेत्रिय स्तरावर एकाच वेळेस मुख्य खात्याकडील तसेच क्षेत्रिय कार्यालयाकडील मनुष्यबळ कार्यरत असते. ही बाब प्रशासकीय स्वरुपाची असली तरी प्रभागातील विविध नागरी समस्यांबाबत लोकप्रतिनिधी, नागरिक यांचेकडून क्षेत्रिय कार्यालयात प्रथमत संपर्क साधला जातो. किंबहुना क्षेत्रिय कार्यालय हे महानगरपालिकेच्या सर्वच विभागांचे प्रतिनिधित्व क्षेत्रिय स्तरावर करीत असते. क्षेत्रिय कार्यालय हे महानगरपालिका प्रशासनाचा प्रथम प्रतिसाद केंद्रबिंदू आहे.
वस्तुतः कामे करणारा विभाग कोणताही असला तरी महानगरपालिका हा मुख्य प्रशासकीय घटक असून त्या अंतर्गत सर्व विभाग व क्षेत्रिय कार्यालये कार्यरत आहेत.
नागरिकांच्या समस्यांचे निराकरण हे कोणत्याही विभागांशी संबंधित असले तरी त्याचे क्षेत्रिय स्तरावर निराकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिक अथवा लोकप्रतिनिधी यांना महानगरपालिका मुख्यालयात येणे अपेक्षित नाही. तथापि, प्रत्यक्षात मात्र क्षेत्रिय कार्यालयाकडून ज्या कामांची अंमलबजावणी मुख्य खात्यांकडून केली जाते अशा कामांबाबत मुख्य खात्याकडे संपर्क साधावा असे सांगितले जाते.
मुख्य खात्याकडून करण्यात येणाऱ्या कामांचे पर्यवेक्षण करणारे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, निविदादार, ठेकेदार हे क्षेत्रिय कार्यालयाच्या सुचनांना प्रतिसाद देत नाही व सूचनांची दखल घेत नाहीत अशी तक्रार क्षेत्रिय कार्यालयाकडून केली जाते. यामुळे महानगरपालिके अंतर्गत असलेल्या विविध कार्यालयामध्ये असमन्वय असल्याचे चित्र तयार होते व समस्यांचे निराकरण न झाल्याने नागरिक व लोकप्रतिनिधी यांचा महानगरपालिका प्रशासनाबद्दल रोष देखील  वाढतो.
याशिवाय नैसर्गिक आपत्ती, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विविध कामांचे प्रभावी पर्यवेक्षण यात
समन्वय राहत नाही. यास्तव एकंदरीतच महानगरपालिका प्रशासनाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. ही वस्तूस्थिती विचारात घेता महानगरपालिकेची क्षेत्रिय कार्यालये तसेच मुख्य खाते याकडून राबविण्यात येणारी कामे, योजना यात समन्वय आणण्याकरिता खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
१. महापालिका सहाय्यक आयुक्त यांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी नोडल अधिकारी” (समन्वय अधिकारी) म्हणून घोषित करण्यात येत आहे.
२. महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अंमलबजावणी होत असलेल्या सर्वच विभागांच्या कामांचे पर्यवेक्षण करावे.
३. महापालिका सहाय्यक आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात विविध विभागांकडून अंमलबजावणी करण्यात येत असलेली कामे, योजना इत्यादीच्या सनियंत्रणाची
जबाबदारी महापालिका सहाय्यक आयुक्त यांची राहील व या सर्व कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ते जबाबदार राहतील.
४. महानगरपालिकेच्या क्षेत्रिय स्तरावर कार्यरत असणाऱ्या सर्वच विभागांच्या सर्व संवर्गातील अधिकारी/ सेवक यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त यांचेशी समन्वयसाधणे व त्यांच्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक आहे. यासाठी महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी दर पंधरवड्याला सर्व संबंधितांची बैठक घेऊन समन्वयाच्या मुद्यांचा आढावा घ्यावा.
५. ज्या विभागांचे क्षेत्रिय स्तरावर अधिकारी कर्मचारी महापालिका सहाय्यक आयुक्तयांच्या सूचनांना प्रतिसाद देणार नाहीत अथवा त्यांचे पालन करण्यास कसूर करतील अशा सेवक / अधिकारी यांचा दरमहा अहवाल महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी संबंधित अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचेमार्फत महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणावा.