Naval Kishor Ram IAS | शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर
| विभाग प्रमुख आणि उपायुक्त देखील होते उपस्थित
Jitendra Dudi IAS – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे समवेत सर्व खाते प्रमुख यांना घेऊन शहराची आज पाहणी केली. (Pune Municipal Corporation – PMC)
सकाळी सहा वाजता शहराची पाहणी सुरू झाली. यामध्ये कॅम्प मनपा हद्दीपासून पुणे स्टेशन, कसबा पेठ, शनिवार वाडा, युनिव्हर्सिटी, औंध, बालेवाडी, बाणेर, पाषाण, डेक्कन या विभागामध्ये रस्ते, पदपथ रस्त्यावरील कचरा, अनधिकृत होर्डिंग, बोर्ड, बॅनर रस्त्यावरील अनावश्यक विद्युत पोल, पावसात रस्त्यावर पाणी साठण्याची ठिकाणे, रस्त्यावरील राडारोडा, अनावश्यक पडलेले ड्रेनेज व पाणीपुरवठ्याचे पाईप, त्याचबरोबर नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत यासाठी करावयाच्या उपायोजना व सार्वजनिक व्यवस्था याबद्दल पाहणी केली. (Pune PMC News)
शहर पूर्णतः स्वच्छ राहील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील याबाबतीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या . याबाबत शहरात महापालिका आयुक्त स्वतः वेळोवेळी पाहणी करणार असून त्या अनुषंगाने स्वच्छ संस्था , नागरिकांचा सहभाग या अनुषंगाने अधिकाऱ्यांसमवेत बैठका देखील घेणार आहेत.
या प्रसंगी संबंधीत विभागाचे खातेप्रमुख, उपायुक्त व अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS