Palakhi Sohala 2025 | गोखलेनगरच्या मनपा शाळेत पालखी सोहळा उत्साहात संपन्न!
Aashadhi Wari 2025 – (The Karbhari News Service) – गोखलेनगर येथील वीर बाजीप्रभू विद्यालय, मनपा शाळा क्रमांक 90 बी मध्ये बालकांनी पालखी सोहळा साजरा केला. विद्यार्थ्यांनी शाळेपासून गोखलेनगर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत दिंडी काढून वारकरी परंपरेचे दर्शन घडवले. (PMC Schools)
सदर प्रसंगी पर्यावरण रक्षणाचा तसेच झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वृक्षदिंडी काढण्यात आली. तसेच सहावीच्या विद्यार्थ्यांनी झेंडे, टाळ यांच्या माध्यमातून पावली सादर केली व सातवीच्या विद्यार्थ्यांनीनी विठ्ठलाचे गाणे सादर केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर विविध अभंग, भजने आणि हरिनामाचा गजर करीत भक्तीने वातावरण निर्माण केले, परतवारीप्रमाणेच विठ्ठल नामाचा गजर करीत शिस्त व भक्ती यांचा सुरेख संगम दाखवित शाळेत या सोहळ्याची सांगता करण्यात आली. पालखीचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता शिंदे आणि सर्व शिक्षक, सेवक, रखवालदार यांनी केले.
COMMENTS