PMC Arogyawardhini Center | महापालिका आरोग्यवर्धिनी केंद्रातील डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय | स्थायी समितीत झाली चर्चा 

Homeadministrative

PMC Arogyawardhini Center | महापालिका आरोग्यवर्धिनी केंद्रातील डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय | स्थायी समितीत झाली चर्चा 

Ganesh Kumar Mule May 08, 2026 8:28 AM

Madhav Jagtap PMC | उपायुक्त माधव जगताप यांच्यावर महापालिका आयुक्त यांच्याकडून कारवाई!  | अतिरिक्त महापालिका आयुक्त यांची माहिती | खाते कुठले मिळणार याची प्रतीक्षा!
Khadakwasla | Ujani Dam | खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा | खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट
Pune Traffic News | पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वंकष वाहतूक आराखडा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

PMC Arogyawardhini Center | महापालिका आरोग्यवर्धिनी केंद्रातील डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय | स्थायी समितीत झाली चर्चा

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – महानगरपालिकेच्या आरोग्यवर्धिनी मध्ये शासनाच्या वतीने डॉक्टरांची निवड करण्यात आली आहे. शासनाच्या वतीने या डॉक्टरांना 60 हजार रुपये मासिक वेतन केले जाते. महानगरपालिकेच्या वतीने या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. यावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Shrinath Bhimale PMC)

पुणेकरांना नाममात्र दरात आरोग्य सेवा मिळावी, या हेतूने राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने शहरात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरु केली आहेत. सद्यस्थितीत महापालिकेच्या 50 हून अधिक दवाखान्यात ही केंद्र सुरु आहेत. 2018-19 सालापासून ही सुविधा देण्यात येत आहे. आगामी काळात आणखी 125 केंद्र तयार केली जाणार आहेत. सरकारनेच यासाठी मंजुरी दिली आहे. याबाबतची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

या केंद्रात महापालिका टेलिकन्सल्टेशन सेवा देत आहे. या माध्यमातून विशेष तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेतले जाते. त्याचा उपयोग शहरातील नागरिकांना उपचार देताना होणार आहे. त्याचप्रमाणे या आरोग्यवर्धिनी केंद्रात ओपीडी, गरोदर माता तपासणी, टीबीवरील उपचार, लसीकरण, योगा शिकवणे अशाही सेवा दिल्या जातात. त्याचा फायदा नागरिकांना होताना दिसतो आहे.

दरम्यान या केंद्रातील डॉक्टरांना ६० हजार मानधन दिले जाते. हे कमी असल्याने डॉक्टर या केंद्रात काम करत नाही. त्यामुळे यात वाढ करण्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: