PMC Action on Hotels | कोथरूड परिसरातील अनधिकृत हॉटेल्स वर कारवाई |२५ हजार स्क्वेअर फिट अनधिकृत बांधकाम हटवले
PMC Action on Hotels – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र ६ ने कोथरूड परिसरातील अनधिकृत हॉटेल्स वर कारवाई केली. या कारवाईत २५ हजार स्क्वेअर फिट अनधिकृत बांधकाम हटवले. अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)
कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे, उप अभियंता श्रीकांत गायकवाड, शाखा अभियंता मुकेश पवार, कनिष्ठ अभियंता मनोज कुमार मते, सागर शिंदे, गणेश ठोबरे, राठोड ऋषिकेश जगदाळे, भावेश इत्यादी स्टाफने अतिक्रमण कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोथरूड मधील स्पाइस गार्डन ,कोरिएंटल लिफ व डेलिहा या हॉटेलचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले .सदर कारवाई दरम्यान जवळपास २५ हजार स्क्वेअर फिट अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात आले.