Pimpari Chinchwad Zoo | पिंपरी चिंचवड : प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

HomeपुणेBreaking News

Pimpari Chinchwad Zoo | पिंपरी चिंचवड : प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कारभारी वृत्तसेवा Dec 12, 2023 6:53 AM

Good Governance Rules |  Maharashtra | देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावलीस मुख्यमंत्र्यांची मान्यता
Maharashtra Cabinet Meeting Decisions | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या 
Onion Price | राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा | प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

Pimpari Chinchwad Zoo | पिंपरी चिंचवड : प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pimpari Chinchwad Zoo | नागपूर | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC Zoo) संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत जाहिर केला. हे प्राणीसंग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहेत.

यासंदर्भात सदस्या श्रीमती अश्विनी जगताप (MLA Ashwini Jagtap) यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

या प्राणीसंग्रहालयाच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार काम करण्यासाठी २०१७ पासून प्राणिसंग्रहालय बंद आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे काही कामे करावयाची असल्याने प्राणी संग्रहालय खुले करण्यात आलेले नाही. दरम्यान, २०१७ ते सन २०२३ या कालावधीत एकूण ३६ प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. सदर प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथील शासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे. ३६ प्राण्यांचा मृत्यू ही गंभीर बाब असून त्याची प्रधान सचिव नगरविकास यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्याच्या वन विकास महामंडळाकडे महापालिकेने हे प्राणीसंग्रहालय हस्तांतरीत करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.