PCPNDT Law | पुण्यात गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या तक्रारी|  मनपाकडून सर्व क्लिनिकच्या काटेकोर तपासणीचे आदेश

Homeadministrative

PCPNDT Law | पुण्यात गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या तक्रारी|  मनपाकडून सर्व क्लिनिकच्या काटेकोर तपासणीचे आदेश

Ganesh Kumar Mule Jul 07, 2026 9:07 PM

PMC Vaccination | पुणे महानगरपालिकेच्या लस साठा साठविणेकरिता वॉक इन कुलर यंत्रणा कार्यरत 
  Polio vaccination campaign will continue till March 9 in Pune Municipal Corporation jurisdiction
PMC Health Department | हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचे लसीकरण | सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी डॉ. राजेश दिघे

PCPNDT Law | पुण्यात गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या तक्रारी|  मनपाकडून सर्व क्लिनिकच्या काटेकोर तपासणीचे आदेश

| पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी कडक करणार

 

Pune Sex Ratio – (The Karbhari News Service) – पुणे शहर आणि ग्रामीण भागात गर्भलिंग निदान, बेकायदेशीर गर्भपात तसेच बेकायदेशीर स्त्रीबीज व संकलन आणि विक्री यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्याने पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाने कडक पावले उचलली आहेत. यामुळे शहरातील मुलींचे प्रमाण (Sex Ratio) कमी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मनपाने सर्व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष आदेश दिले आहेत. अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ राजेश दिघे यांनी दिली. (Dr Rajesh Dighe PMC)

काय आहेत आदेश?
मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा समुचित प्राधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी  दिलेल्या आदेशानुसार :

1. काटेकोर तपासणीचे आदेश
सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी आपल्या कार्यक्षेत्रातील *PCPNDT, MTP, ART (LEVEL I, II), ART BANK आणि SUROGECY CLINIC* यांची कायद्यानुसार काटेकोरपणे तपासणी करावी. त्रैमासिक तपासणीत कोणतीही त्रुटी आढळल्यास ती त्वरित लेखी स्वरूपात PCPNDT विभागाकडे कळवावी.

2. माहिती सादर करण्याचे निर्देश
पीसीपीएनडीटी अंतर्गत नोंदणीकृत *सोनोग्राफी केंद्रांची नवीन प्रभाग रचनेनुसार अद्ययावत माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

तक्रारींमुळे प्रशासन अलर्टवर
वर्तमानपत्रात आणि मनपाच्या आरोग्य कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदानामुळे लिंग गुणोत्तरावर परिणाम होण्याचा धोका असल्याने प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.

कोणत्या संस्थांची तपासणी होणार?

– PCPNDT: गर्भलिंग निदान करणारी सोनोग्राफी केंद्रे
– MTP: गर्भपात करणारी केंद्रे
– ART: प्रजनन तंत्रज्ञान करणारी केंद्रे – लेव्हल १ आणि २
– ART BANK: शुक्रजंतू/अंडी साठवणूक बँका
– SUROGECY CLINIC: सरोगसी क्लिनिक

अधिकाऱ्यांना सूचना
क्षेत्रीय कार्यालयांनी आपल्या हद्दीतील सर्व संबंधित केंद्रांची माहिती गोपनीय रित्या समुचित प्राधिकारी यांना सादर करावी. नियमभंग आढळल्यास त्वरित कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सध्या पुणे मनपाने *पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक* करण्याचा इशारा दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: