Pallavi Surse | कै. सौ. माई पुराणिक स्मरणार्थ “प. पू. माई अभ्यंकर पुरस्कार” पल्लवी सुरसे यांना प्रदान
Pune News – (The Karbhari News Service) – जय शंकर प्रतिष्ठान पुणे आयोजित योगीराज सद्गुरु श्री शंकर महाराज भक्त स्नेहमेळाव्यात कै. सौ. माई पुराणिक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा “प. पू. माई अभ्यंकर पुरस्कार” ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वाभिमानी महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. पल्लवी प्रशांत सुरसे यांना प्रदान करण्यात आला.
सुमारे सात राज्यांमधून आणि चार देशांमधून हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा स्नेहमेळावा पार पडला. प्रारंभी प. पू. पप्पाजी पुराणिक महाराज, खोपडे बापू व श्री बालकिसन राठी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ध्वजारोहण झाले. यानंतर श्री दत्तयाग, सामूहिक गीता पारायण, व विदेशी भक्तांसाठी इंग्रजी भाषांतरित ग्रंथ प्रकाशन यांसारखे कार्यक्रम झाले.
सुरसे यांना हा पुरस्कार त्यांचे महिलांच्या सक्षमीकरणासाठीचे योगदान, विशेषतः कोरोना काळातील कार्य यासाठी विद्यावाचस्पती डॉ. राधिका गुप्ते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, उर्वशीराजे मोहिते पाटील, माधवराव पाटील (ठाणे), प्रशांत सुरसे, डॉ. विनोद, पवन पोतदार, गजानन पत्की आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन प. पू. पप्पाजी पुराणिक यांनी केले होते.
कार्यक्रमात भजन कोकिळा सौ. हेमा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ३४ महिलांचा भजन कार्यक्रम, तसेच डा. अमित शेष, डा. प्रतिमा जाधव व सौ. गौरी कुलकर्णी यांचे सूत्रसंचालन झाले.
या स्नेहमेळाव्यात श्री भोलानाथ तिवारी महाराज, बलरामजी महाराज (प्रयागराज), विष्णुगिरी महाराज (गोरखपूर), शरणार्थ बापू (गिरनार), देवराह जंगल बाबा आदी संत-महंतांचा सहभाग होता.
हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
COMMENTS