OPS PMC Employees  | १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या  ४२५ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू! महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश

Homeadministrative

OPS PMC Employees  | १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या ४२५ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू! महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश

Ganesh Kumar Mule Sep 03, 2025 8:20 PM

PMC Employees Promotion | अखेर उप अधीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना अधीक्षक पदी मिळाली पदोन्नती! | The कारभारी च्या बातमीचा परिणाम! 
PMC Gunvant Kamgar Purskar | गुणवंत कामगार पुरस्कारासाठी महापालिका कर्मचारी उदासीन का? | अर्ज करण्यासाठी अजून एकदा मुदतवाढ
Pune PMC Vs Pune Irrigation | पाटबंधारे विभागाच्या भूमिकेवर महापालिका आयुक्त नाराज!

OPS PMC Employees  | १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या ४२५ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू! महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश

 

Old Pension Scheme – (The Karbhari News Service) – १ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरती जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत ०१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्या नंतर रुजू झालेल्या पुणेमहानगरपालिका अधिकारी / कर्मचारी (PMC Employees) यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन (OPS) योजना लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या कडून अर्ज मागवले होते. त्यानुसार त्यातील ४२५ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार यावर अंमल करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरती जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत ०१ नोव्हेंबर २००५  रोजी किंवा त्या नंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबतचे शासन निर्णय स निर्गमित केलेले आहेत. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना अशा प्रकारे जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेसाठीचा एक वेळचा पर्याय (One Time Option) मागविण्यासाठी कार्यालयीन आदेश निर्गमित करण्यात आलेले होते.

आता पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना शासन निर्णयाचे अनुषंगाने जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेसाठीचा एक वेळचा पर्याय (One Time Option) देणेसाठी  मुदत देण्यात आली आहे.  या प्रमाणे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अर्ज, त्यानुषंगाने आवश्यक असणारी कागदपत्रे आपापल्या वेतनाच्या खात्याचे खातेप्रमुख यांचेमार्फत महापालिका आयुक्त यांचे नावे सादर करावयाचे आहेत. असे प्राप्त होणारे अर्ज तपासून संबंधित खात्याने  कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. तसेच जे अधिकारी / कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेसाठीचा पर्याय सादर करणार नाहीत, त्यांना  शासन निर्णयातील तरतुदीनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (एनपीएस) लागू राहील. असा इशारा देण्यात आला होता.

त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांनी अर्ज केले होते, त्यातील ४२५ कर्मचारी कुणी पेन्शन योजना घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यानुसार यावर अंमल करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त यांनी खालीलप्रमाणे दिले आहेत आदेश :

१)  ४२५ अधिकारी / कर्मचारी हे  शासन निर्णयातील तरतुदीनुसार जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी पात्र ठरत आहेत. त्यानुसार सदर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

२) सदर यादीतील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करताना सं शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी इत्यादीच्या अनुषंगाने लागू होणाऱ्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी. याकरिता सदर कर्मचाऱ्यांकडून आवश्यक असणारे फॉर्म, नमुने, बंधपत्र संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या खात्यांच्या स्तरावरून आणि लेखा विभागाकडील भविष्य निर्वाह निधी विभागाचे समन्वयाने भरून घेण्याची कार्यवाही करावयाची आहे.

३) या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करतानाच त्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे / अंशदायी निवृत्तीवेतन योजनेचे खाते बंद करून भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडणेत यावे. या कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे / अंशदायी निवृत्तीवेतन योजनेच्या खात्यावरील कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील जमा असलेल्या व्याजाच्या लाभाची रक्कम ही त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर वर्ग / जमा करणेत यावी.

४)  कार्यालयीन आदेश प्रसृत होताना सोबतच्या यादीत नमूद केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांमधील काही कर्मचारी सेवानिवृत्त / मयत झालेले असल्यास व त्यांना यापूर्वीच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे / अंशदायी निवृत्तीवेतन योजनेमधील जमा संचित रकमेचे प्रदान केलेले असल्यास अशा कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू करण्याबाबत प्रदान करण्यात आलेल्या संचित रक्कमेबाबत  राज्य शासनाच्या सं निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन त्याप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही संबंधित खाते व मुख्य लेखा वित्त विभागाने करावयाची आहे.
तसेच सदर यादीतील काही अधिकारी / कर्मचारी सेवानिवृत्त / मयत झालेले असल्यास व त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे / अंशदायी निवृत्तीवेतन योजनेमधील जमा संचित रकमेचे प्रदान अद्यापपर्यंत केलेले नसल्यास संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यास त्याच्या वरील खात्यावरील स्वतःचे अंशदान व त्यावरील व्याजाच्या लाभाची रक्कम देय ठरणार आहे. त्यानुषंगाने शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन त्याप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही संबंधित खाते व मुख्य लेखा वित्त विभागाने करावयाची आहे.

५) उपरोक्त प्रमाणे आर्थिक बाबींच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही ही संबंधित अधिकारी व कर्मचारी हे ज्या खात्यात नियुक्तीस आहे किंवा ज्या खात्यातून सेवानिवृत्त / मयत झालेले आहेत अशा सर्व संबंधित खात्यांनी मुख्य लेखा व वित्त विभागाचे समन्वयाने करावयची आहे. उपरोक्त प्रमाणे कार्यालयीन आदेशाची सर्व खातेप्रमुख / विभागप्रमुख यांनी नोंद घेऊन त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: