OPS – NPS | जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी या तारखेपर्यंत अर्ज करता येणार | अन्यथा एनपीएस लागू होणार | महापालिका आयुक्तांचे आदेश 

Homeadministrative

OPS – NPS | जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी या तारखेपर्यंत अर्ज करता येणार | अन्यथा एनपीएस लागू होणार | महापालिका आयुक्तांचे आदेश 

Ganesh Kumar Mule Jan 14, 2025 8:19 PM

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेला राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान!
Increasing Voter Turnout | मतदानाचा टक्का वाढविण्याच्यादृष्टीने मतदान केंद्रावरील सुविधांबाबत व्यापक जनजागृती करा | जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
PMC Pre Monsoon Work | BJP Pune | पुणे महापालिकेने पावसाळा पूर्व कामे 90% पूर्ण केल्याचा दावा चुकीचा | पुणे भाजपचा आरोप

OPS – NPS | जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी या तारखेपर्यंत अर्ज करता येणार | अन्यथा एनपीएस लागू होणार | महापालिका आयुक्तांचे आदेश

 

Old Pension Scheme – (The Karbhari News Service) – १ नोव्हेंबर २००६ पूर्वी पदभरती जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत ०१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्या नंतर रुजू झालेल्या पुणेमहानगरपालिका अधिकारी / कर्मचारी (PMC Employees) यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन (OPS) योजना लागू करणेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. २९ जानेवारी पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. त्यानंतर एनपीएस (NPS) लागू होईल. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरती जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत ०१ नोव्हेंबर २००५  रोजी किंवा त्या नंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबतचे शासन निर्णय स निर्गमित केलेले आहेत. शासन निर्णयानुसार कार्यवाहीसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती परिपत्रकाने निर्धारित केलेली आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना अशा प्रकारे जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेसाठीचा एक वेळचा पर्याय (One Time Option) मागविण्यासाठी कार्यालयीन आदेश निर्गमित करण्यात आलेले होते.

आता पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना शासन निर्णयाचे अनुषंगाने जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेसाठीचा एक वेळचा पर्याय (One Time Option) देणेसाठी दि.२९  जानेवारी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.  प्रमाणे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अर्ज, त्यानुषंगाने आवश्यक असणारी कागदपत्रे आपापल्या वेतनाच्या खात्याचे खातेप्रमुख यांचेमार्फत महापालिका आयुक्त यांचे नावे सादर करावयाचे आहेत. असे प्राप्त होणारे अर्ज तपासून संबंधित खात्याने  कार्यवाही करावयची आहे.

आदेशात पुढे म्हटले आहे की, वरीलप्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून प्राप्त होणाऱ्या अर्जानुसार संबंधित खातेप्रमुखांनी आदेशात नमूद केल्यानुसार  १६ फेब्रुवारी रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावी. जे अधिकारी / कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेसाठीचा पर्याय सादर करणार नाहीत, त्यांना  शासन निर्णयातील तरतुदीनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (एनपीएस) लागू राहील. असा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0