Oath of Voting | मतदानाची शपथ घेणे महापालिका कर्मचाऱ्यांना अनिवार्य | अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांचे आदेश
Oath of Voting | Prithviraj B P IAS – (The Karbhari News Service) – मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मतदार जनजागृती करणेसाठी मतदानाची शपथ घेणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Employees? अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी 11:30 वाजता महापालिका भवनात हजर राहण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मतदार जनजागृती करणेसाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण पद्धतीने मतदान करणेबाबत शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचेकडून सूचित करणेत आले आहे. त्यानुषंगाने सोमवार रोजी सकाळी ११:३० वा. ( अकरा वाजून तीस मिनिटे) मनपा भवन येथील हिरवळीवर आयोजित करणेत आलेला आहे. या दिवशी ह्या कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी व वेळी न चुकता हजर राहावयाचे आहे. सर्व अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी सदरचे कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे मनपा मुख्य भवन, शिवाजीनगर येथील हिरवळीवर उपस्थित राहावे. असे आदेशात म्हटले आहे.