गुरुवारी लष्कर भागात पाणीपुरवठा बंद!
पुणे : गुरूवार रोजी लष्कर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठाबंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक १२/११/२०२१ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
लष्कर जलकेंद्र भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.
COMMENTS
Good
Thank you… for appreciating and giving your precious time..!