शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी उरले अवघे 10 दिवस
: विद्यार्थी आणि पालकांना महापालिकेचे आवाहन
पुणे. दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पालिकेच्या वतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. ती अवघ्या 10 दिवसात समाप्त होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी तात्काळ अर्ज भरण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
– आतापर्यंत 6121 अर्ज प्राप्त
10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्ती योजना आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना महानगरपालिकेकडून प्रदान केली जाते. 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 15 हजार आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 25 हजार दिले जातात. यासाठी खुला गट आणि मागास जातीचा गट, असे दोन गट करण्यात आले आहेत. कुटुंबातील मुले जे स्थानिक नागरिक आहेत ते या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. या शिष्यवृत्तीसाठी संबंधित कुटुंबाकडे मागील तीन वर्षांपासून रेशन कार्ड, मालमत्ता कर बिल, वीज बिलाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीसाठी 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची वेळ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे अर्ज भरता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यासह, आपण संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी देखील संपर्क साधू शकता. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान आतापर्यंत सुमारे 6121 विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. तर अर्ज करण्याची मुदत अवघ्या 10 दिवसांत समाप्त होत आहे. त्यामुळे याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आतापर्यंत सुमारे 6121 विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. तर अर्ज करण्याची मुदत अवघ्या 10 दिवसांत समाप्त होत आहे. त्यामुळे याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.
COMMENTS