कितीही गुन्हे दाखल केले तरी भाजप कार्यकर्ते मागे हटणार नाहीत
: जगदीश मुळीक
पुणे : भाजप नेतर किरीट सोमय्या यांच्या सत्कारावेळी बरेच भाजप कार्यकर्ते जमा झाले होते. कोविड प्रोटोकॉल चे पालन नाही झाले तर आम्ही गुन्हा दाखल करणार, असा इशारा देऊनही न ऐकल्यामुळे आता भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावर भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कितीही गुन्हे दाखल केले तरी भाजप कार्यकर्ते मागे हटणार नाहीत, असे मुळीक म्हणाले.
मुळीक पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने भाजप कार्यकर्त्यांवर सुडाच्या भावनेतून कारवाई केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने विविध आंदोलने आणि मोठा जमाव जमवून जाहीर कार्यक्रम केले. परंतु त्यांचावर कारवाई करण्यात आली नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर महापालिकेत प्राणघातक हल्ला करण्यात आला. परंतु गुन्हेगारांवर सौम्य कलमे लावून त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरल्याने सुडाच्या भावनेतून कारवाई करीत आहे. पुणे पोलिस सरकारच्या दबावाखाली आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे कितीही गुन्हे दाखल केले तरी भाजप कार्यकर्ते मागे हटणार नाहीत. सरकारचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार सातत्याने जनतेसमोर आणू. पुणेकर जनता या सरकारला नक्की धडा शिकवेल.
COMMENTS