NCP – Sharadchandra Pawar Pune | महापुरुषांच्या स्मारकांना पोलिस संरक्षण द्यावे  | सामाजिक सलोखा राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मनपा आयुक्तांना निवेदन

HomeपुणेBreaking News

NCP – Sharadchandra Pawar Pune | महापुरुषांच्या स्मारकांना पोलिस संरक्षण द्यावे | सामाजिक सलोखा राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मनपा आयुक्तांना निवेदन

गणेश मुळे Jun 14, 2024 2:35 PM

7th Pay Commission | Pune PMC News | 7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हफ्त्याची रक्कम कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा | वेतन प्रणालीचे जुने सॉफ्टवेअर आता बंद होणार!
PMC Building Devlopment Department | बाणेर बालेवाडी भागातील हॉटेल, पब वर महापालिकेकडून कारवाई 
PMC Action Against Hotels | मोहम्मदवाडी, कर्वेनगर परिसरात महापालिका बांधकाम विभागाची हॉटेल वर कारवाई 

NCP – Sharadchandra Pawar Pune | महापुरुषांच्या स्मारकांना पोलिस संरक्षण द्यावे

| सामाजिक सलोखा राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मनपा आयुक्तांना निवेदन

 

Pune News – (The Karbhari News Service) – महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना झाली म्हणून समाजात तणाव निर्माण झाल्याच्या, जातीय दंगली झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी महाराष्ट्रात घडल्या आहेत. १३ जून २०२४ रोजी हडपसर येथे एका मनोरुग्णाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दगड फेकून मारल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. सुदैवाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, परंतू भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पक्षाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त  यांना निवेदन सादर करण्यात आले.

शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारके, सामाजिक, राजकीय नेत्यांचे पुतळे अशा ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात यावे, तसेच प्रत्येक ठिकाणी २४ तास पोलिस कर्मचारी तैनात करण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.