NCP SCP Pune | बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीची (शरद पवार) तिरंगा टू-व्हीलर रॅली | 27 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

HomeBreaking News

NCP SCP Pune | बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीची (शरद पवार) तिरंगा टू-व्हीलर रॅली | 27 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Ganesh Kumar Mule Aug 26, 2026 8:29 AM

Rupali Patil : NCP : रुपाली पाटील यांचा अधिकृतपणे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश  : अजित पवार, जयंत पाटील यांची उपस्थिती 
Sanvad yatra by NCP : महाविकास आघाडीचे सर्व निर्णय शहरातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवा 
NCP Parisanvad Yatra : Sharad pawar : Kolhapur : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो सत्तांध भाजपला उखडून टाका : शरद पवार यांचा घणाघात

NCP SCP Pune | बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीची (शरद पवार) तिरंगा टू-व्हीलर रॅली | 27 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

| जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती; युवकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 

Pune News – (The Karbhari News Service) – राज्यातील वाढती बेरोजगारी आणि शिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, पुणे शहराच्या वतीने गुरुवार, दि. 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता ‘बेरोजगार हक्क एल्गार – तिरंगा टू-व्हीलर रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे.

माजी मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे पोहोचणार आहे.

आजचा युवक शिक्षित, कष्टाळू आणि महत्त्वाकांक्षी असतानाही त्याच्या हाताला रोजगार मिळत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि रोजगार हा युवकांचा मूलभूत अधिकार असल्याचा आवाज बुलंद करण्यासाठी ही रॅली आयोजित केल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

पुणे शहराध्यक्ष विशाल तांबे, श्रीकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते सोपान ऊर्फ काका चव्हाण यांनी पुणे शहरातील युवक, विद्यार्थी, बेरोजगार तरुण-तरुणी तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

रोजगार हा उपकार नाही, तो युवकांचा अधिकार आहे. तरुणांच्या भविष्याच्या प्रश्नावर सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शहर नेतृत्वाने केली आहे.

रॅलीचा तपशील:
दिनांक: गुरुवार, 27 ऑगस्ट 2026
वेळ: सकाळी 10:10 वाजता
मार्ग: राष्ट्रवादी काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: