PMC City Engineer Office | आता मनपा अभियंत्यांना चारचाकी नव्हे तर दुचाकीवरून रस्त्यांची पाहणी बंधनकारक

Homeadministrative

PMC City Engineer Office | आता मनपा अभियंत्यांना चारचाकी नव्हे तर दुचाकीवरून रस्त्यांची पाहणी बंधनकारक

Ganesh Kumar Mule Aug 26, 2026 3:23 PM

Bhide Bridge Pune | भिडे पुल पुन्हा वाहतुकीसाठी बंद राहणार! | नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार 
PMC Ranking | PMC Pune Health Schemes | आरोग्य योजनांमध्ये पुणे महापालिकेची रँकिंग 4 थ्या वरून 3 ऱ्या स्थानावर
PMC Duct Policy | ओव्हरहेड केबल मुळे नागरिकांचा जीव धोक्यात | duct policy वर अमल करण्याची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी 

PMC City Engineer Office | आता मनपा अभियंत्यांना चारचाकी नव्हे तर दुचाकीवरून रस्त्यांची पाहणी बंधनकारक

| खड्डे, अतिक्रमण आणि रस्त्यांची गुणवत्ता थेट अनुभवण्यासाठी प्रशासनाचा आदेश; कामात कसूर केल्यास कडक कारवाई

 

Pune PMC News –  (The Karbhari News Service) – पुणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि अतिक्रमणाच्या तक्रारी वाढत असताना पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक काढले आहे. यापुढे पथ विभागातील कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंत्यांपर्यंतच्या सर्व तांत्रिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना चारचाकीऐवजी दुचाकीवरून नियमित स्थळ पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Pune Road)

शहर अभियंता कार्यालयाने  हे परिपत्रक जारी केले आहे. यापूर्वी का आदेश  नुसार सर्व उपायुक्त, महापालिका सहाय्यक आयुक्त आणि मुख्य अभियंता यांनी सकाळी 9.45 ते 11.45 या दोन तासांत त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वतः संबंधित अधिकाऱ्यांसह स्थळ पाहणी करून दैनंदिन अहवाल विभाग प्रमुखांकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगानेच आता पथ विभाग, परिमंडळ झोन क्र. 1 ते 5 आणि त्यांच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवीन रस्ते बनविणे, रस्ते देखभाल व दुरुस्ती आणि पूर्ण:डांबरीकरण ही कामे करणाऱ्या सर्व तांत्रिक कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे.

 

अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते, पदपथ, चौक, जल व मलवाहिन्यांची झाकणे, रस्त्यांवरील व पदपथांवरील खड्डे, रस्त्यांची झीज, अतिक्रमणे तसेच इतर पथविषयक समस्या वेळेत निदर्शनास याव्यात यासाठी दुचाकीवरून पाहणी करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.

चारचाकीतून पाहणी करताना रस्त्यावरील खड्ड्यांचा आणि खराब रस्त्यांचा अंदाज येत नाही. दुचाकीवरून फिरल्यास Road Riding Quality (रस्त्याची वाहन चालवण्याची गुणवत्ता) आणि रहदाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रत्यक्ष अनुभव येईल. पाहणी दरम्यान आढळलेल्या त्रुटी आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबतचा अहवाल विभाग प्रमुखांकडे सादर करणे बंधनकारक असेल.

या कार्यप्रणालीनुसार संबंधित सर्व कर्मचारी/अधिकारी यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, सदर कामात कसूर केल्यास संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परिपत्रकात देण्यात आला आहे.

पुण्यातील रस्त्यांच्या कामावरून सातत्याने टीका होत असताना महापालिकेने काढलेला हा आदेश प्रत्यक्षात रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यास कितपत मदत करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: