NCP SCP on Potholes | भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध |  खड्डेमुक्त पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आंदोलन

HomeBreaking News

NCP SCP on Potholes | भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध |  खड्डेमुक्त पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आंदोलन

Ganesh Kumar Mule Aug 14, 2026 12:19 PM

Pune Property Tax | ३१ मे पूर्वी मिळकतकर भरा आणि ५ ते १०% सवलत मिळवा | मिळकतकर विभागाचे पुणेकरांना आवाहन
Pune Low Emission Zone | पुण्यात आता जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना विशेष प्रदूषण शुल्क!
SRA Pune | सिद्धार्थनगर, नगर रोड (रामवाडी परिसर) येथील २१६ अनधिकृत झोपड्या हटवल्या

NCP SCP on Potholes | भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध |  खड्डेमुक्त पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आंदोलन

| शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने कोंढवा परिसरात आंदोलन करण्यात आले. पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भाजप नेत्यांच्या नावाने कमळ सोडून सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Shrikant Patil Pune NCP SCP)

या आंदोलनात नगरसेवक गफूर पठाण, नगरसेविका अनिता इंगळे, महिला आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षा स्वाती पोकळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी श्रीकांत पाटील म्हणाले, “पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात झाले असून काही नागरिकांना जीव गमवावा लागला, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. मात्र, पुणे महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपकडून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे.”

“पुणेकर नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी न बुजविलेल्या खड्ड्यांच्या कामांसाठी टेंडर काढून जनतेच्या पैशांचा अपव्यय केला जात आहे. महापालिकेपासून केंद्र सरकारपर्यंत भाजपची सत्ता असतानाही पुणे शहरातील रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.

कोंढवा परिसरातील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले असून, खड्ड्यांमध्ये कमळ सोडून भाजपचा निषेध करण्यात आला. “पुणे शहर लवकरात लवकर खड्डेमुक्त करण्यात यावे, अन्यथा येत्या काळात शहरभर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: