PMC Retired Employees Pension | या कारणांमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रकरणे राहताहेत प्रलंबित | सामान्य प्रशासन विभागाची उदासीनता!
PMC Pension – (The Karbhari News Service) – सामान्य प्रशासन विभागाच्या (PMC GAD) उदासीन धोरणामुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लवकर पेन्शन (PMC Pension) मिळताना दिसत नाही. कारण कालबद्ध पदोन्नती, जुनी पेन्शन योजना, सेवाखंड याबाबत सामान्य प्रशासन विभाग कुठलीही भूमिका किंवा निर्णय घेत नाही. त्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. याचा आर्थिक फटका या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
– जुन्या पेन्शन योजनेसाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांचे अर्ज
ज्या कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात देऊन भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली; परंतु ज्यांची नियुक्ती १ नोव्हेंबर २००५ नंतर झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी तसे अर्ज देखील केले आहेत. मात्र सामान्य प्रशासन विभागाने या अर्ज किंवा प्रकरणावर कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या तसेच निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पेन्शन ला लाभ मिळालेला नाही. ही प्रकरणे तातडीने तडीस नेण्याची वाट हे कर्मचारी पाहत आहेत. सामान्य प्रशासन विभागाने यावर अमलबजावणी करणे गरजेचे आहे.
कालबद्ध पदोन्नती बाबत निर्णय नाही
काही सेवानिवृत्त सेवक असे आहेत, ज्यांना १२ वर्षाचा कालखंड होऊन देखील त्यांना कालबद्ध पदोन्नती मिळाली नाही. त्याचा परिणाम पेन्शन प्रकरणा वर होत आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून वेळेत निर्णय झाला तर पेन्शन प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत.
– सेवाखंड बाबत अद्याप निर्णय नाही
महापालिकेतील २७७ सेवकांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नुकतेच कायम करण्यात आले आहे. मात्र या कर्मचाऱ्यांच्या सेवाखंड बाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत कुठलीही भूमिका घेतलेली नाही. याचा फटका मात्र कर्मचाऱ्यांना बसत आहे.
दरम्यान या बाबत सामंत प्रशासन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
COMMENTS