Mosquito Tornados in Kharadi | पुणे महापालिका उपायुक्तांना जलपर्णी भेट! | जाणून घ्या काय आहे प्रकरण 

HomeBreaking Newsपुणे

Mosquito Tornados in Kharadi | पुणे महापालिका उपायुक्तांना जलपर्णी भेट! | जाणून घ्या काय आहे प्रकरण 

गणेश मुळे Feb 28, 2024 1:01 PM

Pune Properties Survey | | PT 3 Application |  नागरिकांचा विरोध सहन करूनही सव्वा तीन लाख मिळकतींचा सर्व्हे!  | १४ ऑगस्ट पर्यंत सर्व्हे संपवणार
PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | आजपासून केली जाणार जप्तीची कारवाई
Deputy Commissioner Pratibha Patil has the additional charge of PMC Chief Security Officer!

Mosquito Tornados in Kharadi | पुणे महापालिका उपायुक्तांना जलपर्णी भेट! | जाणून घ्या काय आहे प्रकरण

 

Pune – (The Karbhari Online) | माजी नगरसेवक महेंद्र पठारे व खराडी येथील नागरिकांनी पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांना जलपर्णी भेट देऊन निषेध व्यक्त केला. (Jalparni in Kharadi Area)

 

खराडी, चंदननगर, केशवनगर, मुंढवा परिसरा लगत वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीपत्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. त्यामुळे डास, माश्या, यांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिक त्रासले असून आजारी पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाला वेळोवेळी पत्राद्वारे कळवूनही उपाययोजना होत नाही. झालीच तर त्या उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाच्या असून समस्येचे पूर्णपणे निराकरण होत नाही. नदीकाठावरील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रचंड वाढलेल्या जलपर्णी कडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. असा आरोप करत माजी नगरसेवक महेंद्र पठारे व खराडी येथील नागरिकांनी पुणे महापालिका उपायुक्रत माधव जगताप यांना जलपर्णी भेट देऊन निषेध व्यक्त केला. (Mosquito Tornados in Pune)

नगरसेवक महेंद्र पठारे प्रभागातील विविध प्रश्नांसंदर्भात सातत्याने आवाज उठवत आहेत. नदी पत्रातील जलपर्णी लवकरात लवकर काढावी असे निवेदन दिले. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यचा इशारा दिला. महापालिका प्रशासनाने यावेळी डासांच्या समस्येवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे , बापू वसंत पठारे, बाळासाहेब विष्णू पठारे, मधुकर पठारे, किरण पठारे, दादा थिटे, वैभव भोसले, दत्तात्रय पठारे, गणेश कांबळे व परीसरातील नागरिक उपस्थित होते.