Medha Patkar : Bill Gates : बिल गेट्स वर मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप

HomeपुणेBreaking News

Medha Patkar : Bill Gates : बिल गेट्स वर मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप

Ganesh Kumar Mule Feb 22, 2022 2:59 PM

MLA Sunil Tingre | पुणे एअरपोर्ट ते विश्रांतवाडी व फाईव्ह नाईन ते नागपूरचाळ या नव्याने बनविण्यात येणारा रोडचा शुभारंभ आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते संपन्न
Banners in Pune : आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या
Inauguration of various projects of Pimpri-Chinchwad Municipal Corporation by Deputy Chief Minister Ajit Pawar

बिल गेट्स वर मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप

: कोरोना ज्या वुहानच्या लॅबोरेटरीतून निघाला त्याचा मालक बिल गेट्स

पुणे : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यावर आज ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी  गंभीर आरोप केला आहे. कोरोना ज्या वुहानच्या लॅबोरेटरीमधून निघाला, त्या लॅबोरेटरीचा मालक दुसरा कोणी नसून बिल गेट्स आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच बिल गेट्स फाऊंडेशनचे मनसुबे काय आहेत, यावर देखील त्यांनी गंभीर भाष्य केले आहे.

मेधा पाटकर  आज पुण्यात आल्या होत्या. आंतरराज्यीय मजूर स्थलांतर कायद्यासंदर्भात त्यांनी कामगार आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. साताऱ्यात या कामगारांना पहाटे तीन वाजता कामाला लावले जाते. त्यांच्या घरात लहान मुले असतात, तरी देखील त्यांच्या आयांना कामाला जुंपले जाते.  मुकादमाचं लायसन्स नाही, कामगारांना वेतन किती मिळतं? त्यांच्या हातात काही कागद मिळत नाही. त्यांना खोपटं आणि पालं यामध्ये राहावं लागतं. त्यांना किमान वेतन मिळत नाही, असे मेधा पाटकर म्हणाल्या.

यानंतर कोरोना काळात मजुरांना घरी पायी चालत जावे लागल्याच्या मुद्द्यावर त्यांनी कोरोनाची उत्पत्ती ही बिल गेट्स यांच्या वुहान लॅबमध्ये झाल्याचा आरोप केला. याचबरोबर बिल गेट्सच्या फाऊंडेशनने अख्ख्या जगाची शेती ताब्यात घेण्याचा डाव आखला आहे. बिल गेट्स हा स्वतः 2 लाख 40 हजार एकरचा मालक आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दखल घेतली नाही म्हणून 1 हजार शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. आता तोमर यांनी बिल गेट्सना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे, असा गंभीर आरोप मेधा पाटकर यांनी केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0