Mayor Manjusha Nagpure on Pune Rain | आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधा – महापौर मंजुषा नागपुरे

Homeadministrative

Mayor Manjusha Nagpure on Pune Rain | आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधा – महापौर मंजुषा नागपुरे

Ganesh Kumar Mule Jul 06, 2026 6:21 PM

Divyang PMPML Free Pass | ग्रामीण भागातील दिव्यांगांना पीएमपी चा मोफत बस पास देण्याबाबत उदासीनता 
Hadapsar | Market | हडपसर मधील भाजी मंडई पूर्ववत होणार! | नागरिक आणि गाळेधारकांना दिलासा
Sharad Pawar | साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला- ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार

Mayor Manjusha Nagpure on Pune Rain | आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधा – महापौर मंजुषा नागपुरे

| संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा आढावा; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या प्रशासनाला सूचना

 

Pune Rain News – (The Karbhari News Service) – गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे शहरातील जनजीवनावर परिणाम झाला असून, शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन शहरातील सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. (Pune Breaking News)

यावेळी शहरातील विविध भागांतील पर्जन्यमान, पाणी साचलेल्या ठिकाणांची स्थिती, मुळा- मुठा नदीपात्रांतील पाणीपातळी, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणेची तयारी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक गतिमान, समन्वयपूर्ण व परिणामकारक पद्धतीने कार्यरत ठेवण्याच्या सूचना देत, संभाव्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. पूरप्रवण क्षेत्रे, नदीकाठचा परिसर, पाणी साचणारे भाग तसेच वाहतूक व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवून सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

तसेच, हवामान विभागाकडून प्राप्त होणाऱ्या इशाऱ्यांच्या अनुषंगाने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे, आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री व संसाधने उपलब्ध ठेवावीत, तसेच नागरिकांना वेळोवेळी अधिकृत माहिती उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पुणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून कार्यरत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक व तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
——

संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. नदीकाठच्या परिसरात तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी अनावश्यक वावर टाळावा. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे. पुणे महानगरपालिकेची यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्णतः सज्ज असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

मंजुषा नागपुरे, महापौर, पुणे.
——–

महत्त्वाचे आपत्कालीन संपर्क क्रमांक
पोलीस : १०० / ११२
रुग्णवाहिका : १०२ / १०८
अग्निशमन विभाग : १०१
जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, पुणे : १०७७ / ०२०-२६१२३३७१
पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग : ०२०-२५५०१२६९ / ०२०-२५५०६८००

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: