98th Marathi Sahitya Sammelan 2025 | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरीता महादजी शिंदे एक्सप्रेस पुणे येथून दिल्लीकरीता रवाना
Delhi Marathi Sahitya Sammelan – (The Karbhari News Service) – पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासात पाहिले मराठी साहित्य संमेलन ही अभिमानाची बाब असून प्रवासात ३० तास हे संमेलन चालणार आहे. अशी माहिती मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत यांनी दिली. (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan)
दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणासाठी जाणाऱ्या साहित्य रसिकांच्या महादजी शिंदे एक्सप्रेला मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून पुणे रेल्वे स्थानक येथून रवाना करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री श्री सामंत म्हणाले, मराठी साहित्य यात्री संमेलनाचा स्वागताध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला आहे. ही माझ्या साठी भाग्याची बाब आहे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने दिल्ली मधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कवी कुसुमाग्रज यांचे नावाने मराठी अध्यसन केंद्र सुरु करण्याचा निर्णय जेनयूच्या कौन्सिल ने घेतला आहे, हा मराठी भाषेचा मान असून मराठी बोलणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा मान आहे. ही अनेक वर्षाची मागणी होती ती आता पूर्ण होत आहे.जेनयू मध्ये एम ए मराठी चा अभ्यासक्रम २७ पासून सुरु होत आहे. दिल्ली मध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चांगल्या गोष्टी घडता आहेत. मराठीसाठी शासन सर्वोतोपरी मदत करित आहे. असे त्यांनी सांगितले.
रेल्वे प्रयाणापूर्वी पुस्तक दिंडी काढण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या विशेष रेल्वेत १ हजार २०० ज्येष्ठ साहित्यिक प्रवास करीत आहेत.मराठी भाषा मंत्री श्री. सामंत स्वतः प्रवास करुन साहित्यकांशी संवाद साधत आहे. दरम्यान या रेल्वेमध्ये मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ही रेल्वे २० फेब्रुवारी रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे.
यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, मराठी साहित्य यात्री संमेलनाचे संमेलनाध्यक्ष शरद तांदळे, कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ कार्याध्यक्ष डॉ. शरद गोरे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त संगिता बर्वे आदी उपस्थित हाते.
COMMENTS