MLA Sunil Tingre | वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार सुनिल टिंगरे यांना संधी 

HomeUncategorized

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार सुनिल टिंगरे यांना संधी 

Ganesh Kumar Mule Oct 25, 2024 8:46 PM

Khadakwasala Vidhansabha | NCP Ajit Pawar खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देण्याची मागणी | अजित पवारांनी दिला सकारात्मक प्रतिसाद
Ajit Pawar Birthday | ४०० रोपांचे वृक्ष लागवड करून उपमुख्यमंत्रीअजित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा 
Farmers | CMO | शेतकऱ्यांबाबत सरकारचे काही महत्वपूर्ण निर्णय

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार सुनिल टिंगरे यांना संधी

 

Vadgaonsheri Vidhansabha – (The Karbhari News Service) – वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार सुनिल टिंगरे यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून अजित पवार यांनी टिंगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान आता या मतदार संघात अजित पवार यांचा गट विरोधात शरद पवार यांच्या गटात लढत होणार आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून माजी आमदार बापूसाहेब पठारे हे रिंगणात उतरले आहेत.

——–

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा कृतज्ञ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महायुती मध्ये सहभागी असणारे सर्व घटक पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, आणि माझ्या परिसरातले सर्व हितचिंतक, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.
लोकांशी माझा असलेला नित्याचा संपर्क आणि त्यांचा मिळालेला विश्वास आणि सहकार्य या सगळ्यामुळेच, मला आणि माझ्या संपूर्ण टीमला, गेल्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांपासून, समाज कल्याणापर्यंत मतदारसंघ सुधारण्यात लक्षणीय प्रगती करता आली. तब्बल १ हजार ५०० कोटींचा निधी राज्य शासन आणि महापालिका यांच्या माध्यमातून मतदार संघातील विकास कामांसाठी आणू शकलो. याचे निश्चितपणे समाधान आहे. अजूनही काही संधी आहेत जिथे लक्षणीय काम होऊ शकतं, त्या सर्व आव्हानांना तोंड देण्यास मी एक लोकनेता म्हणून कटिबद्ध आहे. आपण सगळे एकत्र आलो तर आपण आपल्या परिसराचा विकास अधिक सक्षमपणे करू शकतो.
मला खात्री आहे की यंदाच्या पंचवार्षिक योजनेमध्ये मला मिळालेल्या या संधीचं मी सोनं करेन.
पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठी आणि सर्व नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे, हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार.

सुनिल टिंगरे
आमदार, वडगाव शेरी.
उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0