Mahesh Patil PMC | उपायुक्त महेश पाटील यांना पुणे महापालिकेत पदोन्नती! | पदस्थापने वरून मात्र संभ्रम 

Homeadministrative

Mahesh Patil PMC | उपायुक्त महेश पाटील यांना पुणे महापालिकेत पदोन्नती! | पदस्थापने वरून मात्र संभ्रम 

Ganesh Kumar Mule Feb 25, 2025 9:32 PM

PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्तांच्या जबाबदाऱ्या वाढल्या! देण्यात आले अतिरिक्त पदभार
Vidhansabha Election Process | सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन निवडणूक यशस्वीपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
PMC General Administration Department | सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त्त प्रतिभा पाटील यांच्याकडे!

Mahesh Patil PMC | उपायुक्त महेश पाटील यांना पुणे महापालिकेत पदोन्नती! | पदस्थापने वरून मात्र संभ्रम

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत प्रतिनियुक्ती वर उपायुक्त महेश पाटील यांना राज्य सरकारच्या महसूल विभागाने पुणे महापालिकेत पदोन्नती दिली आहे. त्यांची पदस्थापना करण्यात आली असून त्यांना अपर आयुक्त या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. मात्र पुणे महापालिकेत असे कुठलेही पद नसल्याने यावरून आता संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेत पदोन्नती देताना किंवा प्रतिनियुक्तीने नियुक्ती देताना नगरविकास विभाग किंवा सामान्य प्रशासन विभाग आदेश देतो. मात्र हा आदेश महसूल विभागाचा असल्याने संभ्रम अजून वाढला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

राज्य सरकार कडून अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकारी यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महेश पाटील यांना पदोन्नती देण्यात आली आहे. पाटील हे महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक विभाग, असे विविध विभाग आहेत. त्यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांना पुणे महापालिकेत पदस्थापना देण्यात आली आहे.

पाटील यांना पुणे महापालिकेत अपर आयुक्त पदावर नियुक्त करण्यात आले आहे. मात्र महापालिकेत असे कुठलेही पद अस्तित्वात नाही, असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला जात आहे.

महापालिकेत अतिरिक्त आयुक्तची २ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी सरकारला वेळ मिळत नाही. सरकारच्या या अनास्थेने शहराचे नुकसान होत आहे. त्यात अशा पद्धतीने पदे भरली जातात. राज्य सरकार मन येईल तसा कारभार करून महापालिकेच्या स्वायतत्ते वर गदा आणत आहे, अशी चर्चा आता महापालिका वर्तुळात आहे.

 —-
अपर आयुक्त नावाचे पद पुणे महापालिकेत अस्तित्वात नाही. या पदोन्नती बाबत महसूल विभागाचे आदेश आहेत. त्यामुळे याबाबत त्यांनाच माहिती असावी. शिवाय महापालिकेत पदोन्नती देताना किंवा प्रतिनियुक्तीने नियुक्ती देताना नगरविकास विभाग किंवा सामान्य प्रशासन विभाग आदेश देतो.

प्रतिभा पाटील, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: