Mahavitaran | राज्यातील बत्ती गुल च्या घटनांची संख्या सातत्याने का वाढत आहे?

Homeadministrative

Mahavitaran | राज्यातील बत्ती गुल च्या घटनांची संख्या सातत्याने का वाढत आहे?

Ganesh Kumar Mule Feb 04, 2025 1:32 PM

PM Modi Solapur Tour | प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर – रे नगर येथील 15 हजार घरकुलांचे वितरण
Schools upto 4th in the Maharashtra state will open after nine in the morning
Appeal to file application for Mukhyamantri Yojanadoot initiative

Mahavitaran | राज्यातील बत्ती गुल च्या घटनांची संख्या सातत्याने का वाढत आहे?

Mahavitaran – (The Karbhari News Service) – महावितरणने देखभाल दुरुस्ती खर्च गेल्या दोन वर्षांत आवश्यकतेपेक्षा जवळपास हजार कोटी रुपयांनी कमी केल्याने राज्यभरात बत्ती गुल च्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.

वेलणकर यांच्या निवेदन नुसार महावितरणने नुकताच राज्य वीज नियामक आयोगाकडे आपला बहुवार्षिक वीजदर प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावामध्ये महावितरणने २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षांत राज्यभरात देखभाल दुरुस्ती वर केलेल्या खर्चाची माहिती दिली आहे. राज्यातील वीजग्राहकांसाठी वीजदर ठरवताना संचलन आणि देखभाल ( Operations & Maintenance) साठीही महावितरण करत असलेल्या खर्चाचा समावेश केला जातो, मात्र यासाठी जो खर्च आयोगाने मान्य केला आहे त्याच्या २०% खर्च वीजयंत्रणेच्या देखभाल दुरुस्ती ( repairs and maintenance) साठी खर्च करणे आवश्यक असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. आणि *जर देखभाल दुरुस्ती वरील खर्च संचलन व देखभाल यासाठी मान्य खर्चाच्या २०% पेक्षा कमी झाला तर त्यातून वाचलेले पैसे अन्य कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाहीत. असेही आयोगाने नमूद केले आहे.

यामागील मूळ उद्देशच देखभाल व दुरुस्तीसाठी महावितरणने पुरेसा खर्च करावा जेणेकरून ग्राहकांना विना व्यत्यय वीजपुरवठा मिळेल असा आहे. मात्र महावितरणने आयोगासमोर नुकत्याच सादर केलेल्या पुढील पाच वर्षांसाठीच्या वीजदर प्रस्तावात असे स्पष्ट नमूद केले आहे की त्यांनी २०२२-२३ मध्ये देखभाल दुरुस्ती साठी केलेला खर्च २०% ऐवजी फक्त १३.६% च आहे तर २०२३-२४ मध्ये देखभाल दुरुस्ती साठी केलेला खर्च २०% ऐवजी फक्त १५.५ % च आहे . याचाच अर्थ या दोन वर्षांत मिळून महाविरणने देखभाल दुरुस्ती साठी केलेला खर्च आवश्यकतेपेक्षा जवळपास एक हजार कोटींनी कमी आहे . याचा फटका अर्थातच राज्यभरातील ग्राहकांना बसतो आहे. बत्ती गुल च्या राज्यातील घटनांची संख्या सातत्याने वाढत आहे. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

महावितरणने दर महिन्याला त्यांच्या संकेतस्थळावर वीजपुरवठा खंडीत होण्याच्या घटनांची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. याला विश्वासार्हतेचे निर्देशांक म्हणतात. महावितरण याची माहिती महिनोन्महिने देत नाही. आत्तापर्यंत अनेकदा यासंदर्भात मी तक्रार केली की एकदम २-३ महिन्यांची माहिती जाहीर केली जाते. महावितरणच्या संकेतस्थळावर आज जी विश्वासार्हतेच्या निर्देशांकाची माहिती उपलब्ध आहे ती अत्यंत गंभीर आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये राज्यभरात वीजपुरवठा खंडीत होण्याच्या ७१८८५ घटना घडल्या ज्यामध्ये राज्यातील ग्राहकांना एकूण ४७१३८ तास अंधाराचा सामना करावा लागला तर सप्टेंबर २०२४ मध्ये राज्यभरात वीजपुरवठा खंडीत होण्याच्या ९६५२८ घटना घडल्या ज्यामध्ये राज्यातील ग्राहकांना एकूण ५७३९२ तास अंधाराचा सामना करावा लागला तर ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्यभरात वीजपुरवठा खंडीत होण्याच्या १,०७,०८८ घटना घडल्या ज्यामध्ये राज्यातील ग्राहकांना एकूण ६७८१५ तास अंधाराचा सामना करावा लागला. असेही वेलणकर यांनी यांनी सांगितले.

—-

हे कशामुळे घडते आहे , तर महावितरण वीजबिलात ग्राहकांकडून वीजयंत्रणेच्या देखभाल दुरुस्ती साठी पैसे तर घेतं, पण ते पूर्ण पैसे देखभाल दुरुस्ती साठी खर्चच करत नाही आणि पुरेशा देखभाल दुरुस्ती अभावी वीजयंत्रणा फेल होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. वीजबिल भरूनही ग्राहकांना अंधाराचा सामना करावा लागतो आहे. हे अत्यंत चीड आणणारे आहे पण महावितरणची निष्क्रियता आणि आयोगाचे मौन यामुळे ग्राहक हतबल आहे.

—- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे