Pune News | आपल्या कामासाठी नागरिकांनी थेट कार्यालय, अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा
| पीएमआरडीएतर्फे आवाहन
PMRDA Pune – (The Karbhari News Service) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात (PMRDA Office) काही आर्किटेक आणि मध्यस्थी व्यक्ती नागरिकांना परस्पर भेटून तुमची कामे आम्ही करून देतो असे सांगून दिशाभूल करत आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आपली कामे थेट संबंधित विभागाकडून करून घ्यावी, असे आवाहन पीएमआरडीएतर्फे (PMRDA) करण्यात येत आहे. (Pune PMRDA News)
पीएमआरडीए कार्यालयात नागरिक आपली शासकीय कामे घेऊन सातत्याने येत असतात. यात प्रामुख्याने बांधकाम परवानगी, जमीन मालमत्ता आणि अनधिकृत बांधकाम विभागासह इतर ठिकाणी नागरिक आपल्या कामांसाठी येत असतात. मात्र काही आर्किटेक, अन्य मध्यस्थी व्यक्ती जागा मालकाला परस्पर गाठून तुमची कामे आम्ही करून देतो, असे सांगून त्यापोटी आर्थिक मागणी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र अशा प्रकारे पीएमआरडीएमध्ये कुठलीच कामे होत नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतः आपल्या कामासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, एजंट किंवा इतर मध्यस्थी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS