Mahavikas Aghadi Pune | रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे एकाच वेळी अर्ज भरणार!
| १८ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे पुण्यात शक्तिप्रदर्शन
Mahavikas Aghadi Pune – (The Karbhari News Service) – महाविकास आघाडीचे उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule Baramati Loksabha Constituency), शिरूर लोकसभा मतदारसंघाचे डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe Shirur Loksabha Constituency) व पुणे लोकसभा मतदारसंघाचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Pune Loksabha Constituency) हे तीनही उमेदवार गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी महाविकास आघाडीच्या (Mahaviaks Aghadi Pune) वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. (Pune Loksabha Election)
दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे, रविंद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर रास्ता पेठेतील हॉटेल शांताई समोर महाविकास आघाडीची भव्य सभा होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फटके हे दिग्गज नेते पुण्यातून विजयाचे रणशिंग फुंकणार आहेत.