Maharashtra News | नागोठणे-रायगड येथे अजानवृक्षाचे रोपण आणि सुवर्णपिंपळ बीजप्रसादाचे वाटप

Homeadministrative

Maharashtra News | नागोठणे-रायगड येथे अजानवृक्षाचे रोपण आणि सुवर्णपिंपळ बीजप्रसादाचे वाटप

Ganesh Kumar Mule Jul 04, 2026 2:47 PM

Ajit Pawar | Diwali Padwa With Pawar Family | दिवाळी पाडव्याला अजित पवार नागरिकांना भेटणार नाहीत
Maharashtra Cabinet Meeting Decisions | मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या!
Mohan Joshi Congress | राज्यातील महापालिका निवडणुकांची माजी आमदार मोहन जोशी यांच्यावर विशेष जबाबदारी | प्रदेश काँग्रेस अध्यक्षांची घोषणा

Maharashtra News | नागोठणे-रायगड येथे अजानवृक्षाचे रोपण आणि सुवर्णपिंपळ बीजप्रसादाचे वाटप

पंढरीची वारी व ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य

 

Palakhi Sohala – (The Karbhari News Service) – पंढरीची वारी आणि ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून बुधवारी मुरावाडी, नागोठणे-रायगड येथील श्री ज्ञानेश्वर मंदिर आणि श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणात ज्ञानवृक्ष अजानवृक्षाचे रोपण तसेच सुवर्णपिंपळ बीजप्रसादाचे वाटप उत्साहात पार पडले.

राष्ट्र कर्तव्य, बायोस्फिअर्स, संत सेवा मंडळ श्री ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्ट, माऊली हरित अभियान आणि स्थानिक ग्रामस्थ-वारकरी संप्रदायाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी विश्वरूप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रोहिणी धारप, बायोस्फिअर्सचे संस्थापक डॉ. सचिन पुणेकर, जेष्ठ समाजसेविका  श्रेया कुंटे, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्यासह अनेक मान्यवर, भाविक आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

डॉ. सचिन पुणेकर यांनी अजानवृक्ष आणि सुवर्णपिंपळाचे अध्यात्मिक, पर्यावरणीय व औषधी महत्त्व विशद केले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण, हरित पत्रकांचे अनावरण आणि बीजप्रसादाचे वाटप करण्यात आले.

‘माऊली हरित अभियान’ अंतर्गत श्री क्षेत्र आळंदीतील मूळ सुवर्णपिंपळाचे बीज आणि अजानवृक्षाची रोपे राज्यभर पोहोचवण्याचा उद्देश आहे. अध्यात्म, पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सचिन मोदी आणि नागोठणे ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: