Rahul Gandhi Pune Tour | पुण्यात 22 ऑगस्टला राहुल गांधींचा “छात्रो की गुंज” कार्यक्रम | विद्यार्थ्यांशी करणार संवाद

HomeBreaking News

Rahul Gandhi Pune Tour | पुण्यात 22 ऑगस्टला राहुल गांधींचा “छात्रो की गुंज” कार्यक्रम | विद्यार्थ्यांशी करणार संवाद

Ganesh Kumar Mule Aug 14, 2026 8:00 PM

Natural Calamities | नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
PM Modi Solapur Tour | प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर – रे नगर येथील 15 हजार घरकुलांचे वितरण
Pune Congress | राजकीय गुन्हे सरसकट माफ करावे, ही शहर काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही | शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचे स्पष्टीकरण 

Rahul Gandhi Pune Tour | पुण्यात 22 ऑगस्टला राहुल गांधींचा “छात्रो की गुंज” कार्यक्रम | विद्यार्थ्यांशी करणार संवाद

| विद्यार्थिनींवर राहणार विशेष भर

 

Harshawardhan Sapkal – (The Karbhari News Service) – लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी  22 ऑगस्ट  रोजी पुण्यात “छात्रो की गुंज” या कार्यक्रमासाठी येणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यात झाली. (Pune Congress)

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. त्यामुळे येथे पहिल्यांदाच महिला विद्यार्थिनींशी थेट संवाद साधण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, “छात्रो की गुंज” कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बैजुजी, मनोज त्यागी, महिला अध्यक्षा संध्या सव्वालाखे, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, येशामती ठाकुर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, बाबु नायर, सुनिल मलके, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाचे अध्यक्ष दीप्ती चवधरी, पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष लहुअण्णा निंवगुणे, गटनेते चंदूशेठ कदम यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीचे प्रास्ताविक दीप्ती चवधरी यांनी केले. त्यानंतर प्रशांत जगताप यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबत सूचना मांडल्या.

कार्यक्रमाच्या स्वरूपाबाबत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पुण्यात संपूर्ण देशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र विद्यार्थ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. नीट पेपरफूटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याचा मुख्य केंद्रबिंदू पुण्यात होता.

राहुल गांधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महत्वाचा असलेला विषय ते सरकारपुढे मांडतील. यापूर्वीही राहुल गांधी यांनी अनेक ठिकाणी “छात्रो की गुंज” च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व काँग्रेस नेते, पदाधिकारी, नगरसेवक, फ्रंटल संघटना, सेल आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे असे आवाहनही सपकाळ यांनी केले.

बैठकीत उपस्थित पुणे शहरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध सूचना मांडल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: