Maharashtra News | भारत निवडणूक आयोगाचा पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Homeadministrative

Maharashtra News | भारत निवडणूक आयोगाचा पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Ganesh Kumar Mule Sep 16, 2025 5:19 PM

Ajit Pawar | Diwali Padwa With Pawar Family | दिवाळी पाडव्याला अजित पवार नागरिकांना भेटणार नाहीत
Property Survey | Devendra Fadnavis | सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
100th Natya Sammelan | सोलापुरात होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Maharashtra News | भारत निवडणूक आयोगाचा पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

 

ECI – (The Karbhari News Service) –  भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), पुणे व नागपूर विभागातील पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

 

पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत :

जाहीर सूचना प्रसिद्धी – मंगळवार, 30 सप्टेंबर 2025

वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुनःप्रसिद्धी – बुधवार, 15 ऑक्टोबर 2025

वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुनःप्रसिद्धी – शनिवार, 25 ऑक्टोबर 2025

प्रकरणपरत्वे नमुना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – गुरुवार, 6 नोव्हेंबर 2025

हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई – गुरुवार, 20 नोव्हेंबर 2025

प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी – मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025

दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी – मंगळवार, 25 नोव्हेंबर ते बुधवार, 10 डिसेंबर 2025

दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई – गुरुवार, 25 डिसेंबर 2025

अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी – मंगळवार, 30 डिसेंबर 2025

या पुनरिक्षण कार्यक्रमानुसार संबंधित मतदारांनी वेळेत आवश्यक दावे, हरकती सादर करून नाव नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: