Maharashtra Municipal Corporation Act | भाजपच्या या आमदाराने महापालिका आयुक्त यांच्याकडे मागितली गेल्या ४ वर्षातील ६७ – (३) (C) अंतर्गत झालेल्या कामांची आणि बिलांची  माहिती!

Homeadministrative

Maharashtra Municipal Corporation Act | भाजपच्या या आमदाराने महापालिका आयुक्त यांच्याकडे मागितली गेल्या ४ वर्षातील ६७ – (३) (C) अंतर्गत झालेल्या कामांची आणि बिलांची  माहिती!

Ganesh Kumar Mule Apr 19, 2025 4:39 PM

Update the information of all the departments of the Pune Municipal Corporation – PMC Commissioner Dr Rajendra Bhosale
PMC Water Tanker | टँकर चालकांनी पैसे मागितल्यास पुणे महापालिकेकडे तक्रार करा | महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे आवाहन
PMC Building Devlopment Department | कोथरूड परिसरात पुणे महापालिकेकडून हॉटेल्स वर कारवाई | १०३४९ चौ.फूट अनधिकृत बांधकाम हटवले 

Maharashtra Municipal Corporation Act | भाजपच्या या आमदाराने महापालिका आयुक्त यांच्याकडे मागितली गेल्या ४ वर्षातील ६७ – (३) (C) अंतर्गत झालेल्या कामांची आणि बिलांची  माहिती!

| महापालिका दक्षता विभागाने सर्व खाते प्रमुखांना माहिती देण्याचे दिले आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – भाजपचे गंगापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रशांत बंब (MLA Prashant Bumb Gangapur) यांनी महापालिका आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी Maharashtra Municipal Corporation Act, प्रमाणे ६७ – (३) (C) अंतर्गत १ एप्रिल २०२१ ते आजपर्यंत झालेल्या कामांची आणि बिलांची  माहिती मागितली आहे. त्यानुसार महापालिका दक्षता विभागाने (PMC Vigilance Department) सर्व खातेप्रमुख यांना माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

आमदार बंब यांनी पत्रात म्हटले आहे कि, आपल्या महानगरपालिका अंतर्गत Maharashtra Municipal Corporation Act, प्रमाणे ६७ (३) (C) चा वापर करुन  ०१/०४/२०२१ ते आजतागायत करण्यात आलेल्या सर्व कामांची यादी तसेच ०१/०४/२०२१ पासुन ते आजतागायत ६७ (३) (C) अंतर्गत कामांचे देयकांची सत्यप्रत व सदर देयके अर्थात ६७ -(३) (C) चा वापर करुन जे देयके अदा करण्यात आलेली आहेत. त्यां सर्व देयकांची ज्या मोजमाप पुस्तिकांमध्ये मोजमापे नोंदविलेली आहेत. ते सर्व मोजमाप पुस्तिका ची सत्यप्रत मला देण्यात यावी. तसेच Bill form ज्या आधारे देयके अदा करतेवेळी कंत्राटदाराची स्वाक्षरी घेण्यात येते असे सर्व देयकांचे forms अर्थात Running Account bill किंवा Final Bill चे सत्यप्रत मला ७ दिवसांत देण्यात याव्यात. असे आमदारांनी पत्रात म्हटले आहे.

या पत्रानुसार महापालिका खडबडून जागी झाली आहे. महापालिका दक्षता विभागाने सर्व विभाग प्रमुखांना या बाबत सूचित केले आहे. दक्षता विभागाने आदेशात म्हटले आहे कि, या पत्राच्या अनुषंगाने आपले स्तरावर परस्पर संबधितांस माहिती कळवण्यात यावी.

दरम्यान गेल्या ४ वर्षातील ६७ – (३) (C) अंतर्गत झालेल्या कामाबाबत महापालिका प्रशासनावर बरेच दोषारोप झाले आहेत. मात्र आता सत्ताधारी पक्षाच्या ते ही पुणे विभाग सोडून असलेल्या आमदाराने माहिती मागवल्याने सर्वांच्या भुवया  उंचावल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: