Maharashtra Day in PMC | पुणे महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन साजरा!
Maharashtra Day 2025 – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिन निमित्त बुधवार दि. १ मे २०२५ रोजी मा. डॉ. राजेंद्र भोसले, प्रशासक तथा महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)
प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS), यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच सकाळी ६.२५ वाजता मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळेस राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणण्यात आले.
याप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) प्रदीप चंद्रन, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) पृथ्वीराज बी.पी., मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे, तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS