Madhuri Misal Pune | आनंददायी शिक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध | नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची ग्वाही
School Opening – (The Karbhari News Service) – विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची वाटावी यासाठी कृतीयुक्त आनंददायी शिक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक कलानुसार करिअरसाठी आवडीचे कौशल्य विकास शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. (Pune News)
बिबवेवाडीतील पुणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात ‘शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमा’च्या निमित्ताने, विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करताना मिसाळ बोलत होत्या. सहाय्यक शिक्षणप्रमुख सुभाष रावत, जयेश शेंडकर, पर्यवेक्षिका शोभा घोडे आणि मुख्याध्यापिका आरती पोळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, “आजपासूनच राज्यातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणात क्रांतिकारी बदल होत आहेत. केवळ पाठांतरावर भर न देता, अनुभवावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. खेळ, गाणी, गोष्टी, कोडी, नाटक, चित्रकला, प्रकल्प यांचा शिक्षणात समावेश असेल. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील आणि शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल.”
COMMENTS