Letter Bomb : पुणेकर नागरिकाच्या तक्रारीने महापालिका आणि सरकारी कार्यालयात खळबळ

Homeपुणेमहाराष्ट्र

Letter Bomb : पुणेकर नागरिकाच्या तक्रारीने महापालिका आणि सरकारी कार्यालयात खळबळ

Ganesh Kumar Mule Sep 18, 2021 9:35 AM

Katraj Zoo Online Ticket | आता कात्रज झू मध्ये तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही | घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट
Award | मराठवाडा जनविकास संघाचा शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’ने गौरव
Ram Mandir Celebration | श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त २२ जानेवारीला दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा  | श्रीनाथ भिमाले यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी 

IAS अधिकाऱ्यांना मराठी येत नसल्याने ते आमची पत्रे पाहत नाहीत

: पुणेकर नागरिकाच्या तक्रारीने महापालिका व सरकारी कार्यालयात खळबळ

: मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

पुणे: एका पुणेकराने महापालिका सहित पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र पाठवले आहे. ज्यात तक्रार केली आहे कि यातील कुठलेही प्रशासन आमच्या तक्रारींकडे लक्ष देत नाही. या सगळ्या अधिकाऱ्यांना तक्रार केल्यानंतर पुणेकर नागरिकाने आता मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली आहे. त्यात म्हटले आहे कि प्रशासन आमच्या तक्रारींकडे लक्ष देत नाही. शिवाय IAS अधिकाऱ्यांना मराठी येत नसल्याने ते आमच्या पत्राकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आम्हाला न्याय द्या, असे पत्रात म्हटले आहे. संबंधित नागरिकाने पत्रात आपले नाव न देता काही मोबाईल नंबर दिले आहेत.

: वाचा जसेच्या तसे पत्र

मुख्यमंत्री साहेब,

मुख्यमंत्री साहेब, जलसंपदामंत्री, ज़िल्हाअधिकारी, महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त साहेब, महापौर,नगरसेवक, आमदार,खासदार

करा लोकांची कामे….

आपल्या सर्व प्रशासनाने आमच्या अर्जाला केराची टोपली दिली आहे.कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. दुर्गंधी आणि गाड्या कालव्यात कोसळत आहेत.कोरोना पेक्षा जास्त प्रमाणात रोगराई मुळे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. आम्ही दिलेल्या अर्जा प्रमाणे1)पुणेमहानगरपालिका आयुक्त2)पुणे महापौर3)खडकवासला पाटबंधारे विभाग4)जलसिंचन विभाग पुणे5)हडपसर क्षेत्रियकार्यालय यांनी/प्रशासनाने आमच्या अर्जाला थोडे तरी महत्व द्यावे. कार्यवाहीला सुरुवात करावी. हि विनम्र विनंती..

आत्तापर्यंत पाच महिन्यात एकही अधिकारी बघायला आला नाही. खास करून (बी. बी लाहोर, संजय तेली, विक्रम कुमार,सौरभ राव,राजेश देशमुख )आणि ज्या अधिकाऱ्यांला मराठी येत नाही. त्यामुळे आमचे मेल बघत नाही. काही अधिकारी म्हणतात खास करून खडकवासला पाठबंधारे विभाग आणि पुणे महानगपालिका अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय आमचं काही उखडू शकत नाही.
मुख्यमंत्री कार्यालयाला 4 ते 5 वेळा मेल केला. काय उपयोग आहे कि नाही तुमचा.. का तुम्ही फक्त काम पुढे ढकलायची काम करता का..? एखादा सारखा मेल करतोय त्याचे काम पूर्ण होत.. ही बाब लक्षात घ्या…

मोबाईल नं. 9561461745 , 7038590505

8888165757 , 9763251818

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0