LaQshya Programme | माता आणि बाल मृत्यू कमी करण्याबाबत पुणे महापालिकेची राष्ट्रीय स्तरावर दखल 

HomeBreaking Newsपुणे

LaQshya Programme | माता आणि बाल मृत्यू कमी करण्याबाबत पुणे महापालिकेची राष्ट्रीय स्तरावर दखल 

Ganesh Kumar Mule Jun 03, 2023 1:33 PM

Dearness allowance |  महागाई भत्त्याची फाईल मोदी मंत्रिमंडळात पोहोचली | आता केव्हाही जाहीर होऊ शकते | जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट
8th pay commission | 8 वा वेतन आयोग येणार की नाही?  केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण 
5G spectrum auction | 5G स्पेक्ट्रमच्या शर्यतीत कोण चॅम्पियन बनले? | जाणून घ्या संपूर्ण माहिती

LaQshya Programme | माता आणि बाल मृत्यू कमी करण्याबाबत पुणे महापालिकेची राष्ट्रीय स्तरावर दखल

| “लक्ष्य” कार्यक्रमासाठी पुणे महापालिकेला केंद्र आणि राज्य सरकारकडून  “Quality Certification”

LaQshya Programme | मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रसूती कक्ष व शस्त्रक्रिया गृहामध्ये गुणवत्ता सुधारणे (Labour room quality improvement initiative), याबाबत केंद्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाकडून (Health ministry) लक्ष्य कार्यक्रम (LaQshya Programme) राबवला जातो. पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) या कार्यक्रमा अंतर्गत चांगले काम केल्याने याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने (Central and state government) देखील याबाबत पुणे महापालिकेचे  (PMC Pune) कौतुक केले आहे. अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव (Assistant Health officer Dr Vaishali Jadhav) यांनी दिली. (LaQshya Programme)

मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रसूती कक्ष व शस्त्रक्रिया गृहामध्ये गुणवत्ता सुधारणे (Labour room quality improvement initiative) आणि
सुरक्षित प्रसूती / मातृत्वाचा जास्तीत जास्त मातांना लाभ देण्याकरिता सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार मार्फत एक महत्वाकांक्षी कार्यक्रम Labor Room Quality Improvement Initiative (LaQshya) “लक्ष्य” कार्यक्रम राबवण्यात येतो. राज्य स्तरावरून निवडण्यात आलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय (Kamala Nehru hospital) आणि कै. चंदुमामा सोनावणे प्रसूतिगृह ( PMC Chandumama Sonawane Labour room) येथे हा कार्यक्रम राबविला जात आहे.

याबाबत डॉ वैशाली जाधव यांनी सांगितले कि, “लक्ष्य” कार्यक्रमांमध्ये प्रत्येक संस्थांनी स्वतःचे परीक्षण केल्यानंतर त्यांचे राज्यस्तरीय चमूकडून परीक्षण करण्यात येते.  जर त्या परीक्षणामध्ये त्यांना LaQshya च्या चेकलिस्ट नुसार ७०% पेक्षा जास्त गुण प्राप्त झाल्यास राष्ट्रीय स्तरावरील चमूकडून अंतिम परीक्षण करण्यात येते. दोन्ही संस्थामधील वैदकीय अधिकारी-कर्मचारी यांचे ‘लक्ष्य’ कार्यक्रमाबाबतचे प्रशिक्षणही पार पाडण्यात आले आहे. स्व:परीक्षणात आढळून आलेल्या त्रुटी दूर करणेसाठी विविध प्रकारच्या अहवालांचे अद्यावतीकरण, पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण व बळकटीकरण, विविध वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षणाद्वारे कौशल्यामध्ये वाढ व त्याचे अद्यावतीकरण इत्यादी बाबी सदर कार्यक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान करण्यात आल्या होत्या. (PMC Pune Health Department)
डॉ जाधव यांनी पुढे सांगितले कि, “लक्ष्य” कार्यक्रम अंतर्गत कमला नेहरू युसीएससीचे  २७ ते २८ मार्च २०२३ रोजी तर कै.चंदुमामा सोनावणे युसीएससीचे राज्यस्तरीय परीक्षण  २९ ते ३० मार्च २०२३ रोजी यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. या परीक्षणामध्ये या दोन्ही आरोग्य संस्थांच्या प्रसूतिकक्ष व मॅटर्निटी शस्त्रक्रियागृहांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये कै. चंदुमामा सोनावणे युसीएससीच्या प्रसूतीकक्षाला ८९% तर मॅटर्निटी शस्त्रक्रियागृहाला ९९% आणि कमला नेहरू युसीएससीच्या प्रसूतीकक्षाला ८८% तर मॅटर्निटी शस्त्रक्रियागृहाला ९०% इतके गुण प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही संस्थांची “Quality Certification”   झाले आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये  लक्ष्य कार्यक्रम ‘२०२१’ पासून लागू झाला असून प्रथमच दोन्ही संस्थांच्या राष्ट्रीय स्तरावरील परिक्षणात यश प्राप्त झाले आहे. असे डॉ जाधव यांनी सांगितले. (PMC Pune News)
—-
News Title |LaQshya Program | Attention of Pune Municipal Corporation at national level regarding reduction of maternal and child mortality| “Quality Certification” from Central and State Govt to Pune Municipal Corporation for “Lakshya” programme.