Kothrud Drainage System | कोथरूड परिसरात मोठया व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्याचे मायकोप्लोनिंग करा | पृथ्वीराज सुतार यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी
Prithviraj Suta Shivsena – (The Karbhari News Service) – संपूर्ण कोथरूड मध्ये आगामी २०-२५ वर्षामध्ये निर्माण होणान्या सदनिकाची सख्या लक्षात घेऊन मोठया व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्याचे मायकोप्लोनिंग करावे. यासाठी आवश्यक ते तज्ञ नेमून, सपूर्ण कोथरूड परिसरामध्ये मोठया व्यासाची ड्रेनेज व्यवस्था निर्माण करावी. त्वरीत यासाठी आवश्यक तो निधी राखीव ठेवावा. अशी मागणी शिवसेना नेतर पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.
सुतार यांच्या महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनानुसार कोथरूड भागाचा विकास साधारण ३५ ते ४० वर्षापूर्वी झाला. पुणे शहरातील एक सुनियोजित भाग म्हणून कोथरूड ओळखला जातो. हा भाग विकसित होत असताना प्रथम तेथील मूलभूत सुविधा (ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, रस्ते, वीज ) अशा निर्माण केल्या गेल्या. त्यामुळे कोथरूड झपाटयाने विकसित होत गेले आणि कोथरूडचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आशिया खंडातील सर्वात वेगाने विकसित होणारे उपनगर म्हणून कोथरूडची नोंद झाली. याचे सर्व श्रेय तत्कालीन लोक प्रतिनिधी माजी मंत्री श्री शशिकांतभाऊ सुतार याना जाते. त्यांनी दूरदृष्टी ठेऊन या ठिकाणी मूलभूत सेवा निर्माण केल्या.
सुतार यांनी म्हटले आहे कि, कोथरूड बदलत आहे. नवीन पुनार्विकासाकडे वाटचाल सुरू आहे, नवीन वाधकाम नियमावली आली आहे. त्यामुळे वाधकाम चटई क्षेत्र मोठया प्रमाणात वाढले आहे, म्हणजे आता नवीन विकसनामध्ये कोथरूड मध्ये फ्लॅटची संख्या चौपटीने वाढणार आहे. असे असताना, मुलभूत सुविधामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. आता सुध्दा मोठया प्रमाणात सदनिका निर्माण होत असताना, ड्रेनेज लाईन या छोटया असल्यामुळे रस्त्यावरून ओसांडून वाहत आहेत, सर्व ताण या जुन्या मुलभूत सुविधावर आल्यामुळे नागरिकाना अनेक प्रश्नाना सामोरे जावे लागत आहे. या पत्राद्वारे आपल्याकडे आमच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने मागणी करीत आहोत की, आपण सपूर्ण कोथरूड मध्ये आगामी २०-२५ वर्षामध्ये निर्माण होणान्या सदनिकाची सख्या लक्षात घेऊन मोठया व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्याचे मायकोप्लोनिंग करावे, यासाठी आवश्यक ते तज्ञ नेमून, सपूर्ण कोथरूड परिसरामध्ये मोठया व्यासाची ड्रेनेज व्यवस्था निर्माण करावी. त्वरीत यासाठी आवश्यक तो निधी राखीव ठेवावा. अशी मागणी सुतार यांनी केली आहे.