Khasdar Jansampark Seva | खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद | राज्यमंत्री माधुरी मिसाळही अभियानात सहभागी
Pune News – (The Karbhari News Service) – पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाच्या पाचव्या टप्प्याला पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैयक्तिक कामे, नागरी समस्या, सार्वजनिक आणि नव्या कल्पनांसह सहाशेहून अधिक नागरिक थेट केंद्रीय मंत्री मोहोळ यांना भेटले. राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांचीही या उपक्रमास पूर्णवेळ उपस्थिती होती. (Pune News)
नागरिकांचे प्रश्न समजून घेता यावेत आणि ते वेळेत सुटावेत यासाठी खासदार मोहोळ यांनी खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार कोथरुड विधानसभा मतदारसंघातून सुरु केला. त्यानंतर कसबा, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातही हा उपक्रम राबविण्यात आला. पर्वती विधानसभा मतदारसंघात झालेला हा पाचवी टप्पा होता. नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासह शासनाच्या विविध योजनांचे स्टॅाल्स, आधार कार्ड संदर्भातील स्टॅाल्सही यावेळी उपलब्ध करुन देण्यात आले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा उपक्रम राबविला जातो.
या संदर्भात अधिक माहिती देताना केंद्रीय मोहोळ म्हणाले, ‘पर्वतीच्या अभियानात ६०० पेक्षा अधिक नागरिकांनी टोकन घेत भेट घेतली. थेट नागरिकांना भेटताना नागरिकांसह मलाही मिळणारे समाधान मोठे आहे. भेंडीमध्ये विशेषतः वैयक्तिक कामे आणि नागरी प्रश्न सांगण्यावर नागरिकांचा कल दिसला. जे विषय लगेचच सुटू शकतील अशा कामांसंदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच दीर्घकालीन कामांसंदर्भातही अधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम आखण्यासंदर्भात सूचित केले’
—–
टोकन व्यवस्थेमुळे प्रत्येकाला मिळते भेटण्याची संधी !
खासदार जनसंपर्क सेवा अभियानांतर्गत खा. मोहोळ यांची भेट घेण्यासाठी सुरुवातीला टोकन द्वारे नोंदणी करुन घेतली जाते. त्या टोकनच्या क्रमांकद्वारे नागरिकांना थेट भेटण्याची संधी मिळते. शिवाय भेटासाठी किती कालावधी लागू शकतो याचा अंदाजही नागरिकांना येतो. या टोकन प्रक्रियेमुळे अभियानात सहभाग घेण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.
COMMENTS