Pune Ganeshotsav 2025 | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ७ दिवस परवानगी

Homeadministrative

Pune Ganeshotsav 2025 | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ७ दिवस परवानगी

Ganesh Kumar Mule Aug 25, 2025 7:37 PM

Purandar Airport | पुरंदर विमानतळाच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- पी. वेलरासू
Tukaram Maharaj Bij | इंद्रायणी नदीचे पाणी पिण्याकरीता वापरण्यास मनाई  | श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू
Pune News | पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा | जिल्हाधिकारी

Pune Ganeshotsav 2025 | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ७ दिवस परवानगी

 

Pune News – (The Karbhari News Service) – राज्य शासनाने गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान ७ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्गमित केला आहे. (Jitendra Dudi IAS)

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सूट दिल्याबाबत यापूर्वीच्या ३१ जानेवारी २०२५ रोजीच्या आदेशात बदल करून हे सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार गणेशोत्सवासाठी शनिवार ३० ऑगस्ट, रविवार ३१ ऑगस्ट, सोमवार १ सप्टेंबर, मंगळवार २ सप्टेंबर, बुधवार ३ सप्टेंबर, गुरुवार ४ सप्टेंबर, शनिवार ६ सप्टेंबर या एकूण ७ दिवसांच्या कालावधीत सदर निर्बंधांना सूट देण्यात आली आहे. याशिवाय नवरात्री उत्सवासाठी बुधवार १ ऑक्टोबर व गुरुवार २ ऑक्टोबर, ख्रिसमससाठी गुरुवार २५ डिसेंबर आणि वर्षाअखेरसाठी बुधवार ३१ डिसेंबर रोजीही या निर्बंधांना सूट देण्यात आली आहे. तसेच महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार परवानगी देण्याच्या अनुषंगाने एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

ध्वनी प्रदुषण नियम २००० मधील नियम ३ व ४ व ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) चे पालन करण्यात यावे, झोनिंग प्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये. ही सूट शांतता क्षेत्रात लागू नसेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0