महापालिकेसोबत नेहमीच पत्रयुद्ध खेळणारे पाटबंधारे आता साधणार समन्वय!
: विविध कामे मार्गी लावण्यासाठी समन्वय समिती गठीत
पुणे : पाटबंधारे विभागाकडून पुणे महापालिकेला नेहमीच पाणी वापर कमी करा म्हणून सुनावले जाते. शिवाय अतिरिक्त पाणी वापराचा दंडपाटबंधारे समन्वय भरा म्हणून नेहमीच पत्र देखील पाठवले जातात. शिवाय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाटबंधारे कडून महापालिकेबाबत नेहमीच तक्रार केली जाते. मात्र आता पाटबंधारे विभाग महापालिका प्रशासनासोबत समन्वय साधणार आहे. कारण महापालिकेलाच या समन्वयाची आवश्यकता आहे. विविध कामे मार्गी लावण्यासाठी ५ लोकांची एक समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये महापालिका आणि पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
५ अधिकाऱ्याची समिती
पुणे महानगरपालिकेकडून पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेमध्ये कामे करताना पाटबंधारे विभागाशी समन्वय ठेवणे आवश्यक आहे. तदनुषंगाने, पुणे महानगरपालिका व पाटबंधारे विभाग यांचेमध्ये समन्वय ठेऊन काम करणेकरीता ५ अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. या कक्षामार्फत पाटबंधारे विभागाशी निगडीत असलेल्या मर्व कामांमाठी प्रस्ताव तयार करुन सादर करणे, वेळोवेळी पाठपुरावा करणे, पूर्तता करणे व अन्य तदनुषंगिक कामे संबंधित खात्याशी समन्वय साधून कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत करणे अपेक्षित आहे. महापलिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
COMMENTS